दुचाकीची आयशरला धडक; विद्यार्थिनी ठार, दोघी गंभीर

सिन्नर:
नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे शिवारात दुचाकी व आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या धडकेत चास येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी ठार झाली तर अन्य दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. शनिवारी (दि.28) दुपारी 4.15 च्या सुमारास हा अपघात घडला.
साक्षी अनिल खैरनार (20, रा. चास, ता. सिन्नर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून गंभीर जखमी सविता सूर्यभान सांगळे (20 रा. सोनेवाडी, ता. सिन्नर), वर्षा सुभाष जगताप (20, रा. कासारवाडी, ता. सिन्नर) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 


याबाबत सविस्तर वृत्त असे की, चास, कासारवाडी व सोनेवाडी येथील रहिवाशी असलेल्या साक्षी खैरनार, सविता सांगळे व वर्षा जगताप तिघी विद्यार्थिनी संगमनेर येथून सीईटीचा क्लास संपवून ऍक्टिव्हा स्कुटीने (क्र.एमएच-15, एचएल-1419) घराकडे परतत होत्या. नांदूरशिंगोटे शिवारात खंडोबा मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोवर (क्र.एचआर.61 डी-9843) या विद्यार्थिनींची भरधाव दुचाकी धडकली. त्यात साक्षी खैरनार हिचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत प्रवाशांच्या मदतीने गंभीर जखमी सविता सांगळे व वर्षा जगताप या विद्यार्थिनींना संगमनेर येथे उपचारांसाठी हलविण्यात आले. मृत साक्षी खैरनार तसेच सविता सांगळे व वर्षा जगताप यांनीजखमी सविता सांगळे व वर्षा जगताप या विद्यार्थिनींना संगमनेर येथे उपचारांसाठी हलविण्यात आले. मृत साक्षी खैरनार तसेच सविता सांगळे व वर्षा जगताप यांनी नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती. पुढील महाविद्यालयीन प्रवेशासाठी सीईटीच्या क्लासमध्ये या तिघी जात होत्या. क्लास सुटल्यानंतर तिघी एकाच दुचाकीवर घराकडे परतत असताना हा भिषण अपघात झाला.
याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आर.टी. तांदळकर करत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *