सिटीलिंकच्या दोन नवीन मार्गावर बससेवा होणार सुरू

नाशिक : प्रतिनिधी

सिटीलिंकच्यावतीने दोन नवीन मार्गावर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. तर ६ बसेसची वाढ करण्यात येणार असून सोमवार पासून  दोन नवीन मार्ग सुरू करण्यात येत आहे .

पहिला मार्ग क्र . १०२- निमाणी ते बारदान फाटा मार्गे कॉलेजरोड , महात्मानगर कार्बन नाका ते बारदान फाटा . निमाणी ते बारदान फाटा सकाळी ५.४५ ते २०.३० वाजेपर्यंत तर बारदान फाटा ते निमाणी सकाळी ७.०० ते २१ . ३५ वाजेपर्यंत दर १ तासाच्या अंतराने बससेवा सुरू करण्यात येणार आहे .

हेही वाचा: सिटीलिंक बसला तोट्यात नेणारे ‘ ते ‘ मार्ग होणार बंद

दुसरा मार्ग क्र . २०४ – नाशिकरोड ते पाथर्डी गाव मार्ग बिटको द्वारका वडनेर भैरव ते पाथर्डी गाव . नाशिकरोड ते पाथर्डी गाव सकाळी ५.४५ ते २१.४५ वाजेपर्यंत तर पाथर्डी गाव ते नाशिकरोड सकाळी ७.४० ते २०.४० वाजेपर्यंत दर दीड ते दोन तासाच्या अंतराने बससेवा सुरू करण्यात आली आहे .

मुख्य म्हणजे पंचवटी रेल्वेच्या वेळेनुसार यामार्गावरील बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे . या नवीन दोन मार्गाबरोबरच मार्ग क्रमांक १२८ वरील बसफेऱ्यामध्ये वाढ करण्यात आली आहे . मार्ग क्र . १२८ निमाणी ते चुंचाळे गाव मार्गे सिव्हिल , त्रिमूर्ती चौक , कामटवाडा ते चुंचाळे गाव . या मार्गावरील बसफेऱ्या पूर्वी १ तासाच्या अंतराने धावत होत्या त्या आता अर्ध्या तासाच्या अंतराने धावणार आहे . जास्तीत जास्त प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या च्या वतीने करण्यात आले आहे .

हेही वाचा : सिटीलिंक सुरू करत आहे तीन नविन मार्गांवर बससेवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *