बळी महाराज चौकात ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार

पंचवटी : प्रतिनिधी
श्री बळी मंदिर महाराज चौकात उड्डाणपुलाखाली आडगाव बाजूने नवीन आडगाव नाक्याकडे जाणार्‍या ट्रकचालकाने रिक्षा, दुचाकी, तसेच चारचाकी वाहनांना धडक दिल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
या घटनेत अ‍ॅक्टिव्हावरील एकजण ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाला. ज्या ट्रकने अपघात केला त्याचा चालक मद्यपान केलेल्या स्थितीत असल्याने हा अपघात घडला, असे पोलिसांनी सांगितले.
अपघातानंतर पोलिसांनी राधेशाम नामक संशयित ट्रकचालकाला तत्काळ ताब्यात घेतले. अपघात घडला त्यावेळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी पंचवटी, आडगाव पोलिस, वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम केले. या अपघाताबाबत आडगाव पोलिस ठाण्यात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, असे पोलिसांनी सांगितले.
या अपघातबाबत माहिती अशी ट्रक (आर जे 27 जीडी 6231) चालक आडगाव बाजूने नवीन आडगाव नाक्याकडे जाताना बळी महाराज चौकात असलेल्या उड्डाणपुलाखाली आला. त्यावेळी रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यात उभ्या अ‍ॅक्टिवा (एमएच 15- एचव्ही 8488), तसेच कार (एमएच 15 -एफएफ 2367), (एमएच 17 – एझेड 2561), एक रिक्षा आणि दुचाकीला धडक दिली. त्यात मोपेड अ‍ॅॅक्टिव्हावरील व्यक्ती चाकाखाली सापडून ठार झाली.

Two-wheeler rider killed after being run over by a truck at Bali Maharaj Chowk.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *