नाशिक

शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

मानोरी खुर्दमधील हृदयद्रावक घटना

लासलगाव : वार्ताहर
घराचे बांधकाम सुरू असताना खेळत असलेले दोन अल्पवयीन मजुरांची मुले घरामागील शेततळ्यात पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि.7) दुपारी अडीच वाजेचा सुमारास निफाड तालुक्यातील मानोरी खुर्द परिसरात घडली.
याबाबत करण तानाजी वावधाने यांनी दिलेल्या खबरीनुसार, मानोरी खुर्द येथील नवनाथ सोपान वावधाने यांच्या मालकीच्या शेतातील गट क्रमांक 148/2 मध्ये नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकामासाठी मध्य प्रदेशातील मजूर काम करीत आहेत. बुधवारी दुपारी बांधकामाचे काम सुरू असताना मजुरांची मुले परिसरात खेळत होती. खेळता खेळता अरविंद दिनेश गोरे (वय 11, रा. ठोकबेडा, पो. घुसगाव, ता.राजापूर, जि. बडवणी, मध्य प्रदेश) आणि सनी अजय रावत (वय 10, रा.चमुकनाज, ता.गुनावर, जि.पन्ना, मध्यप्रदेश) हे दोघे घराच्या मागील शेततळ्यात जाऊन पडले. पाण्यात बुडाल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले. कुटुंबीय व घरमालकाच्या ही घटना लक्षात येताच त्यांना तातडीने शेततळ्यातून बाहेर काढून उपचारासाठी लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळकृष्ण अहिरे यांनी तपासणीनंतर दोन्ही मुलांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, हवालदार संदीप शिंदे तसेच औदुंबर मुरडनर, अरुण डोंगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हवालदार संदीप शिंदे तपास करीत आहेत.

Two young children drown in a farm pond.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago