बदलते निसर्गचक्र, शासनाच्या धोरणाचा परिणाम
नाशिक : अश्विनी पांडे
राज्यात दुष्काळ जाहीर झाला असून, जिल्ह्यातील दहा तालुक्यांतही दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. दुष्काळाच्या सर्वाधिक झळा या बळीराजाला सोसाव्या लागतात. परिणामी नाशिक जिल्ह्यात 2021 ते जुलै 2026 या कालावधीत 82 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांपैकी 62 शेतकरी आत्महत्येची प्रकरणे शासनाच्या निकषानुसार मंजूर झाली आहेत. या आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून अर्थसाह्य करण्यात आले आहे.
नाशिक जिल्हा कृषिप्रधान मानला जातो. जिल्ह्यात बागायती क्षेत्र अधिक असल्याने शेतकर्यांकडे आर्थिक सुबत्ता आहे. नाशिक जिल्हा कांदा व द्राक्ष उत्पादनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. कांदा, द्राक्षे, टोमॅटो, फुले, पालेभाज्या निर्यातीत नाशिक जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. तांदळासह कडधान्याचेही मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात उत्पादन घेण्यात येते. शेतकरी आत्महत्येची सर्वाधिक प्रकरणे मराठवाडा, विदर्भात उघडकीस येत असताना नाशिक जिल्ह्यातही आत्महत्येचे प्रकरण उघडकीस येत आहे.
शेतकरी आत्महत्येचे प्रकरण प्रशासनाकडे आल्यानंतर त्याची छाननी करत प्रशासनाकडून ते पात्र ठरल्यानंतर शेतकर्यांना अर्थसाह्य देण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षांत निसर्गचक्रात सातत्याने होत असलेला बदल आणि शासनाचे धोरण यामुळे शेतकर्यांना परिि स्थतीशी सामना करताना आत्महत्येचा पर्याय निवडावा लागत आहे. जिल्ह्यातील आत्महत्येची कारणे ही नापिकी, कर्जबाजारीपणा असल्याचे प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.
दरम्यान, राज्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील परिस्थिती पाहता शासनाने राज्यातील 265 तालुक्यांत ट्रिगर-1 दुष्काळ जाहीर केला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा समावेश आहे.
पुढील वर्षीही अल निनोचा प्रभाव जाणवण्याची शक्यता असल्याने शासन सतर्क झाले आहे. पुढील वर्षभर पाणी टिकावे यासाठी उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिसरात 10 टक्के पाणीकपातीचे संकेत दिले आहेत. परिणामी दुष्काळाची दाहकता अधिक गंभीर रूप घेण्याची शक्यता आहे.
शासनाकडून लाखाचे अर्थसाह्य
आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून आत्महत्येचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर एक लाखाचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. एक लाख रुपये हे संबंधित तहसील कार्यालयामार्फत आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबीयांना वितरित करण्यात येतात. एक लाखापैकी पोस्टातील खात्यावर 70 हजार रुपये एफडी स्वरूपात, तर 30 हजार रुपये रोख स्वरूपात देण्यात येतात.
मालेगावमध्ये सर्वाधिक आत्महत्या
मालेगाव तालुक्यात गेल्या सहा वर्षांत सर्वाधिक 23 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याखालोखाल बागलाण 21, निफाड 16, सिन्नर 7, येवला 4, दिंडोरी व चांदवड प्रत्येकी 3, तर नांदगाव 2 व देवळा, नाशिक आणि कळवण प्रत्येकी एका शेतकर्याने आत्महत्या केली आहे. जिल्ह्यात एकूण 82 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील 62 शेतकर्यांच्या आत्महत्येची प्रकरणे शासन दरबारी मंजूर झाली असून, आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून अर्थसाह्य करण्यात आले आहे.
82 farmers ended their lives in six years.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…