शहरातील खड्डयांनी घेतला दोन युवकांचा बळी

शहरातील खड्डयांनी घेतला दोन युवकांचा बळी

शहर अभियंता यांचा खड्डे बुजवल्याचा दावा ठरला फोल

नाशिक : प्रतिनिधी

शहरातील खड्डे बुजवल्याचा शहर अभियंता अग्रवाल यांचा दावा फोल ठरला असून, खड्ड्यामुळं दोन युवकांना जीव गमवावा लागल्याची घटना शहरात घडली आहे.
सिबिएस ते सिटीसेंटर मॉल च्या रस्त्याने दुचाकीहून जाणाऱ्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा बांधकाम भवन येथील डिवायडर जवळ गाडीचा अचानक तोल गेल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दिनांक २६ सप्टेंबर रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास अभिजित अशोक मराठे (२३, दामोदर नगर, पाथर्डी फाटा ) व मयूर जगदेव कावरे (२३, अष्टविनायक चौक, सावता नगर सिडको ) हे त्यांच्या दुचाकी वरून जात असतांना त्यांचा त्यांच्या गाडीवरील तोल गेल्याने येथील डिवायडर वर आपटल्याने त्यांच्या डोक्यास व हातास गंभीर मार लागला होता. अपघात घडल्यानंतर येथील काही नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.याबाबत मुंबई नाका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून  तपास मुबंई नाका पोलीस करीत आहेत. अभिजीत मराठे(२३) हा एमसीएचे शिक्षण घेत होता. मोठ्या बहिणीचे लग्न झाले असून हा एकुलता एक होता. आई वडील पाथर्डी फाटा येथे दामोदर नगर येथे राहतात. मयुर जगदेव कावरे (२३)
मित्राच्या फ्लॅटवर अभ्यास करण्यासाठी जात असे दिनांक २६ ला त्याचा आयटीचा पेपर होता.पाटबंधारे ऑफिस समोर असलेल्या कच मुळे गाडी स्लीप होऊन अपघात झाल्याचे येथील नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत होते.तो एकुलता होता. एक बहिण आई वडील असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *