नाशिक

उज्वला  पुन्हा चुलीकडे!

महिलांच्या गेट टुगेदरमध्ये
चुलीवर पदार्थ करण्याची क्रेझ

 

नाशिक (NASHIK) ः प्रतिनिधी
चुलींतून निघणार्‍या धुरामुळे प्रदूषण होते.  चुलीत वापरल्या जाणार्‍या लाकडांमुळे जंगलाची तोड होते.  शिवाय धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन डोळ्यांवरही परिणाम होतो. चुलीचा वापर करणारा वर्ग सामान्य असल्याने ते गॅस खरेदी करू शकत नाही, अथवा भरू शकत नाही.  म्हणून उज्वला गॅस योजना सरकारने आणली. चुल जाऊन गॅसचा वापर होण्याची अपेक्षा होती.  या योजनेला एकीकडे प्रतिसाद मिळाला असताना शहरवासीयांना मात्र आता चुलीची भुरळ पडल्याने उज्वला आता गॅसकडून पुन्हा चुलीकडे वळली आहे.  हॉटेलमध्ये (Hotel) चुलीवरच्या खाद्यपदार्थांची क्रेझ निर्माण झाली असतानाच आता महिलांच्या गेट टुगेदरमध्येही किचन ओट्यावर ही आधुनिक चुल पोहोचली आहे.चुलीच्या वापरामुळे होणार्‍या त्रासापासून महिलांना  मुक्ती मिळावी यासाठी पंतप्रधान योजनेअंतर्गत उज्वला योजनेद्वारे गॅस कनेक्शनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु चुलीवरच्या पदार्थांना विशिष्ट खमंग चव असल्याने खवय्यांची पसंती मिळत आहे. परिणामी महिलांही विशेष प्रसंगी किंवा आठवड्यातील एक दिवस गॅसला सुटी देवून चुलीवरच्या जेवणाचा बेत आखत आहे.

 

 

 

जिल्ह्यात चुलीवरच्या मिसळपासून ते आइस्क्रीम, चहा आणि विविध व्हेज नॉनव्हेज पदार्थांची मोठी क्रेझ आली आहे. अनेक हॉटेल्स आणि ढाब्यांवर मोठ मोठे ङ्गलक लावले जात आहे.प्रवासादरम्यान किंवा वीकेंडला खास चुलीवरच्या पदार्थांवर ताव मारला जात आहे.

 

हेही वाचा: महिला वारकऱ्यांना मिळणार या सुविधा

शहर आणि उपनगरांमध्ये विविध महोत्सवांमध्ये खाद्य पदार्थांचे स्टॉल्स् लावले जात आहेत.  त्यात विशेषतः चुलीवरचे पदार्थ आणि खापरावरील मांडे यांना विशेष पसंती दिली जात आहे.
महिलांच्या भिशी पार्टी किंवा वीकेंड, सहलीमध्येही आवर्जून चुुलीवर स्वयंपाक करून बालपणीच्या भातुकलीची आठवण मोठेपणी चुलीच्या निमित्ताने काढली जात आहे.  चुलीवर स्वयंपाक करणे जुन्या जाणत्या महिला सफाइदारपणे करीत असे.आताच्या पिढीतील मुली महिलांना चूल पेटविण्यापासून ते चुलीतील जाळ कमी जास्त कसा करावा, पदार्थ कच्चा किंवा जळायला नको यासाठी जाणकार महिलांकडून मार्गदर्शन घेतले जात आहे. चुलीसाठी मातीपासून तयार केलेली किंवा तीन दगडांची चूल वापरली जात असे.आताही लग्नात मातीची खेळण्यातील किंवा खरोखरची मोठी चूल भेट दिली जाते.चुलीबरोबर पारंपारिक पाटा वरवंटाचा वापरही कमी झाला होता.गॅस कनेक्शन, मिक्सर ने जागा वेळ आणि कष्ट कमी झाल्याने महिलांना होणारे त्रास कमी झाले. मात्र, आता पुन्हा जुन्या साधनांचाच वापर वाढीला लागल्याचे
चित्र आहे.

 

हेही वाचा:खड्डा चिकनची शहरात वाढती क्रेझ
Ashvini Pande

Recent Posts

येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे ‘जेन झी’ ब्रेकअप साँग प्रदर्शित

ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! ‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे…

5 hours ago

मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही… कुठे घडला नेमका हा प्रकार?

मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही... कुठे घडला नेमका हा प्रकार? शहापूर : प्रतिनिधी…

5 hours ago

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला गती

मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्‍यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…

2 days ago

जातो माघारी पंढरीनाथा…

महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…

2 days ago

जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी जोर‘धार’; धरणांतून विसर्ग

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्‍या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…

2 days ago

सरदवाडी धरण ओव्हरफ्लो; भोजापूरच्या पूरचार्‍यांना सोडले पाणी

आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…

2 days ago