महापालिकेच्या जाहिरात-परवाना विभागाकडून कारवाई होणार
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेने अनधिकृत अतिक्रमणधारकांवर कारवाईचा धडाका लावला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू केलेल्या कारवाईत साडेचारशेहून अधिक अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, महापालिकेच्या जाहिरात व परवाना विभागाने आपला मोर्चा शहर विद्रूपीकरण करणार्या अनधिकृत होर्डिंग्जकडे वळवत दिवाळी संपताच विशेष मोहीम राबवून अनधिकृत होर्डिंग्जधारकांवर कारवाई केली जाणार आहे.
महापालिकेच्या जागांवर सुमारे 250, तर खाजगी ठिकाणी 400 होर्डिंग्ज परवानाधारक आहेत. मात्र, शहरात यापेक्षा अधिक होर्डिंग्ज असून, अनेक ठिकाणी व्यावसायिक होर्डिंग्जच्या आकारात (साइज) अधिक वाढ करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेच्या महसुलात घट होत आहे. शहरात यापूर्वी अवघ्या 28 ठिकाणीच होर्डिंग्जसाठी परवानगी दिलेली असताना, ठेकेदाराने 54 ठिकाणी होर्डिंग्ज उभारून कोट्यवधींची कमाई केल्याचे उघड झाले होते. काही ठिकाणी परवानगी घेण्यापूर्वीच फलक उभारण्यात आल्याचेही समोर आले होते. यासंदर्भात ठेकेदाराला नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मनपाच्या जाहिरात आणि परवाने विभागातील काही अधिकार्यांच्या संगनमताने कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. यानंतर या विभागातील एका अधिकार्यावर कारवाईदेखील झाली होती. महापालिकेने ठरवून दिलेल्या मान्यताप्राप्त जागांव्यतिरिक्त अनेक इमारतींवर व खाजगी ठिकाणी नागरिकांकडून लहान-मोठ्या फलकांची उभारणी झाल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहिमेंंतर्गत दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी विभागनिहाय पथकांची निर्मिती करण्यात येणार आहे.
दिवाळी संपताच शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केली जाईल. अनेक ठिकाणी परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात व्यावसायिक होर्डिंग्ज लावल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. त्यामुळे अशा होडिर्ंग्जधारकांवर कारवाई केली जाणार आहे.
-सुवर्णा दखने, उपायुक्त, जाहिरात व परवाना विभाग, मनपा
‘लाडकी बहीण’ला धक्का नाही : मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : प्रतिनिधी राज्यात दुष्काळाचे सावट आणि तिजोरीवरचा…
मुंबई : प्रतिनिधी टेलिकॉम क्षेत्रात सध्या तगडी स्पर्धा सुरू असताना सरकारी कंपनी ’बीएसएनएल’ने पुन्हा एकदा…
सप्तशृंगगडावर कर्तव्यावर असताना काळाचा घाला सप्तशृंगगड : प्रतिनिधी श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांच्या…
जुहूतील पुष्पा पार्क येथे वर्दळीत थरार, अभिनेता सुरक्षित मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर…
विजयादशमी अर्थात, दसर्याला मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांना मागणी असल्याने सध्या सर्वत्र झेंडूच्या मळ्यांत तोडणी सुरू…
दि. 18 ते 24 ऑक्टोबर 2026 मेष : अनपेक्षित लाभ या आठवड्यात चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत.…