लासलगाव रोडवर अपघातात मनमाडच्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

लासलगाव रोडवर अपघातात मनमाडच्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
मनमाड : प्रतिनिधी

– मनमाड लासलगाव रोडवर रायपूर येथे खंडेराव मंदिराजवळ मोटरसायकल व इको गाडीचा समोरासमोर अपघात होऊन मनमाडच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली आहे अपघात झाल्यानंतर रायपूरचे पोलीस पाटील साहेबराव नारळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले दोन्ही तरुणांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आणले प्रथमोपचार करून त्यांना मालेगाव येथे अधिक उपचारासाठी नेत असताना रस्त्याचा त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेमुळे शहरावर शोक काळा पसरली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड शहरातील गौतम नगर येथील रहिवासी पवन विनोद जाधव वय वर्ष 20 तर त्याचा मित्र बोरकरवाडी येथील रहिवासी योगेश पद्माकर अडांगळे वय 21 हे दोघे मोटरसायकल क्रमांक एम एच 15 बी ए 82 86 या गाडीने लासलगाव मार्गे विंचूर कडे निघाले होते याच वेळी रायपूर येथील खंडेराव महाराज मंदिराजवळील वळणावर समोरून येणारी इको गाडी क्रमांक एम एच 19 डी व्ही 73 94 या गाडीसोबत समोरासमोर धडक झाली या धडके पवन व त्याचा मित्र योगेश हे दोघे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच रायपूर येथील पोलीस पाटील साहेबराव नारळे यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले दोन्ही तरुणांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले यावेळी त्यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी मालेगाव येथे नेण्यात आले मात्र मालेगाव कडे जात असताना अर्ध्या रस्त्यातच दोघांची प्राणज्योत मालवली या घटनेची माहिती मिळतात मनमाड शहरावर शोक कळा पसरली आहे या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे

मनमाड लासलगाव महामार्गाची रुंदी वाढवावी
शहरात सर्वत्र झपाट्याने महामार्गांची वाढ होत आहे यात अनेक दुर्गती महामार्ग चार पदरी करण्यात आली आहे मात्र मनमाड लासलगाव हा महामार्ग अजूनही एकेरीच आहे या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे यामुळे मनमाड ते लासलगाव दरम्यान रोज छोटे-मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी होत आहे यामुळे मनमाड ते लासलगाव या महामार्गाची रुंदी वाढवण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे

Bhagwat Udavant

Recent Posts

अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…

1 day ago

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

2 days ago

‘एसएमबीटी’त घडत आहेत संशोधक

नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…

2 days ago

कुंभमेळा कक्षाची स्थापना, पण कर्मचार्‍यांची वानवा

नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…

2 days ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

2 days ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

2 days ago