वादळी वार्यासह गारांचा पाऊस, पिकांचे प्रचंड नुकसान; बळीराजा पुन्हा संकटात
चांदवड/नगरसूल/येवला/सटाणा : प्रतिनिधी
चांदवड शहरासह संपूर्ण तालुक्यात रविवारी दुपारी अवकाळी पावसाने तुफान वादळी वार्यासह जोरदार हजेरी लावली. निसर्गाच्या या अवकृपेमुळे काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तालुक्यातील तिसगाव परिसरात तर वादळी वार्यासोबतच गारांचा पाऊस झाला. यामुळे उन्हाळी कांदा आणि कांद्याचे बियाणे (डोंगळे) यांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. तसेच हिवरखेडे परिसरातही पावसाचा जोर अधिक असल्याने काढणीला आलेला उन्हाळी मका, गहू आणि हरभरा ही पिके जमिनीवर आडवी झाली आहेत.
केवळ हीच गावे नव्हे, तर तालुक्यातील विविध भागांत अवकाळीने तडाखा दिला असून, संपूर्ण तालुक्यात नुकसानीचे सावट पसरले आहे. आधीच बाजारभावामुळे हवालदिल असलेल्या शेतकर्यांवर आता निसर्गाचा कोप झाल्याने शेतकरीवर्ग पूर्णपणे कोलमडून गेला आहे. या गंभीर परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन, बाधित क्षेत्राचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि पीडित शेतकर्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.
शेतकर्यांची तारांबळ
येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात वादळी वार्यासह जोरदार पाऊस होऊन शेतीमालाचे नुकसान झाले. दुपारी दोन वाजेपासूनच येवला शहर आणि तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील राजापूर, जायदरे, रेंडाळे, न्याहारखेडे, ममदापूर, कोळम आदी गावांमध्ये दुपारी साडेतीन -चार वाजेच्या दरम्यान अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकर्यांची तारांबळ उडाली असून, या बेमोसमी पावसाचा दणका कांदा, मका, तसेच गव्हालादेखील बसला आहे. पावसामुळे शेतीमालाचे नुकसान झाले. दरम्यान, झालेल्या वादळी अन् बेमोसमी पावसामुळे शेतीमालाचे नुकसान झाले. या नुकसानीची प्रशासनाने पाहणी करून नुकसान झालेल्या शेतांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते श्रावण देवरे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भातील शेतीपिकांचा पाहणी दौरा संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासमवेत करणार असल्याचे देवरे पाटील यांनी स्पष्ट केले. अचानक आलेल्या अवकाळी व गारांच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असून, काही भागात मोठ्या प्रमाणात तर काही भागात सुदैवाने गारा कमी वेळ झाल्याने त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. पण, काही भागात मोठ्या प्रमाणात झाल्याने काढणीस आलेला गहू, उन्हाळ कांदा गारांमुळे झोेडपला गेला आहे.
Unseasonal rain hits Chandwad, Yeola, Baglan talukas
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…