संपादकीय

गुन्हेगारीवर नियंत्रण आणणारा ‘कायद्याचा बालेकिल्ला’ पॅटर्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 150 दिवसांच्या कृती आराखड्याबाबत शासकीय कार्यालयांमध्ये ई-प्रशासन सुधारणा आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी 150 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्यात ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला उपक्रम’ राबविणार्‍या नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयास पोलीस आयुक्तालय गटात प्रथम क्रमांक मिळाला आहे. याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यानिमित्त…

नाशिक पोलीस आयुक्तालयाने या उपक्रमात संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअ‍ॅप, चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉक चेनचा वापर आणि भौगोलिक माहिती प्रणाली या सात घटकांवर सहभागी कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले होते. दीडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात आले होते. कार्यालयाची वेबसाइट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअ‍ॅॅप चॅटबॉट व एआयचा शासकीय कामकाजात वापर अशा सात सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कार्यालयांची निवड करण्यात आली होती.
दीडशे दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात नाशिक पोलीस आयुक्तालयाने ई-गव्हर्नन्समध्ये शून्य प्रलंबितता धोरणाचा स्वीकार करीत अव्वल कामगिरी केली आहे.
नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला उपक्रमाच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण, ई-ऑफिस, तक्रार निवारण व विविध निकषांद्वारे 200 पैकी 156 गुण मिळवून नाशिक पोलीस आयुक्तालयाने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालयाने डिजिटल उपक्रम राबविले. पोलीस आणि नागरिकांमधील संवाद वाढावा म्हणून नागरिकांशी थेट संवादाचे उपक्रम राबविले. त्यासाठी पोलीस आयुक्त आपल्या दारी, ई-मीट विथ सीपी, वॉक इन टूर, दर मंगळवारी विविध घटकांना पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाची माहिती देणे, असे उपक्रम राबविले. यामुळे पोलीस दलाविषयी नागरिकांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण झाली. तसेच पोलीस दलाने तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याने कामकाजात पारदर्शकता, गतिमानता आली.
याबरोबरच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्ट्रीट क्राइम, महिला सुरक्षा, नागरिककेंद्रित पोलिसिंगवर भर दिला. त्यांनी नागरिकांसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक कार्यान्वित केला. त्यावर नागरिकांच्या विविध सूचना येतात. त्यांची तातडीने दखल घेण्यात येते. नाशिक पोलीस आयुक्तालय दैनंदिन कामकाजाबरोबरच आता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करत आहे. या कुंभमेळ्यासाठी सुमारे 35 हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. गोदावरी घाट परिसरासह नाशिक शहराची तीन स्तरांमध्ये विभागणी करण्यात आली असून, कोअर एरिया, प्राथमिक व दुय्यम विभाग अशा स्वरूपात सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे. पर्वणीच्या दिवसांपूर्वीच 36 तास अगोदर विशेष सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्याचे नियोजन पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
(शब्दांकन : जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक)

The ‘fortress of law’ pattern that controls crime

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

4 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

4 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago