उपयोग…खरं तर जटील प्रश्न!!! कुणाचा उपयोग कशासाठी कोण कशाप्रकारे कधी संधी साधून स्वतः च्या स्वार्थासाठी उपयोग करून घेईल. याचा कुणीच तर्क लावु शकत नाही. आपण कल्पना करु शकत नाही. इतका उपयोग खुप गोष्टींचा असतो. तो कशाप्रकारे करायचा, कशासाठी करायचा, कुणासाठी करायला हवा. हे ठरवता आले पाहिजे. याचा विवेक साधता यायला पाहिजे.
 पुस्तकांचा, उपकरणांचा, वस्तुंचा, पशुंचा, पक्षांचा, निसर्गाचा, माणसांचा अगणित गोष्टींचा उपयोग दैनंदिन प्रत्येकाच्या जीवनात काही अमुलाग्र बदल घडवत असतात. आपल्या नकळत आयुष्य सुखकर करण्यासाठी माणसा इतका स्वार्थी दुसरा कुणीही नाही. प्रत्येक गोष्टीचा उपयोग माणसानं स्वतःसाठी करुन घेतला आहे.
 पुस्तकांच्या वाचनाचे उपयोगाचे किती तरी फायदे आहेत. बर्याच वेळा असं म्हणतात की वाचाल तर वाचाल!!! खरं तर पुस्तके माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात…असं वाचताना आले. माहित नाही हा विचार कुणाचा पण विचार करायला लावणारी उपयोगी गोष्ट इतकं नक्कीच…
आधुनिकता प्रचंड वेगाने वाढत आहे. सर्व काही आता क्षणार्धात मिळते आहे. पुर्वीच्या जुन्या वस्तूंची जागा आता आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या वस्तूंनी भरलेली आहे. जुन्या गोष्टींचा आता तितका उपयोग होत नाही. फार फार तर शोभेसाठी आपण त्या गोष्टी आपल्याजवळ हव्यात म्हणून त्यांना काय ते जीवनात स्थान…
पशु आणि पक्षी यांचा ही उपयोग करून मानवजातीने आपला विकास साधला आहे. आजही शेती ही बैलांच्या साह्याने केली जाते. घोडागाडी, बैलगाडी यांचा उपयोग हा उदरनिर्वाहासाठी काही ठिकाणी आहे. पक्षांचा उपयोग पुर्वी पासुन पत्रव्यवहारासाठी केला जात होता…
  पण आधुनिकतेमुळे आता शत्रुवर नजर ठेवण्यासाठी पक्ष्यांच्या डोक्यावर अगदी छोट्या कॅमेरा मार्फत नजर ठेवण्यात येते. मन आणि डोकं एकाच वेळी स्तब्ध व्हावे इतकी ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे…कोण कुणाचा कुठल्या प्रकारचा काय वापरुन उपयोग करून घेईल याचा विलक्षण उदाहरण!!!
निसर्ग आपल्याला फक्त देतच आलाय…मग तो  तेजस्वी सुर्य प्रकाश असो, चंद्राची शितलता, निर्मळ पाणी, सुखद वार्याची झुळूक, शहारा आणणारी थंडी आणि बरंच काही…निसर्गाकडून आपण फक्त घेतच आलो आहोत. निसर्ग आपल्यावर निस्वार्थी आणि दुजा भाव नसलेलं प्रेम करते. त्याचा उपयोग सांगायला कदाचित सगळेच असमर्थ असतील…
माणसांचा उपयोग माणसानं इतका कुणीच करुन घेतला नसेल. घर बांधताना असंख्य कारागिरांना मदतीला घ्यावे लागते. खरं तर कुठलीच महान गोष्ट माणुस एकटा करु शकत नाही‌. अल्प तरी सहाय्यक मदतीला वेळेला उपयोगी पडतातच.
८४ लाख पशु पक्षी किटक यांच्या पेक्षा वेगळे असे माणसाला निसर्गानं आणि ईश्वरी शक्तीने बुध्दी आणि हास्य दिले आहे. तिचा उपयोग कसा करायचा हे ज्याचं त्यानं ठरवावं… बुध्दीने एखाद्याला अडचणीत पण आणु शकतो आणि त्याच बुद्धीचा योग्य उपयोग करून अडचणीतुन बाहेर येऊ शकतो. असं महान लोक सांगतात. हे ही ऐकण्यात आले आहे.
आयुष्यात स्वतःच्या स्वार्थाचा, कुणाच्या साधेपणाचा, कुणाच्या उदार वागण्याचा, कुणाला बेअक्कल, खोटं ठरवण्यासाठी अशा असंख्य गोष्टीसाठी माणुस माणसांचा, वेळेचा, चतुर स्वभावाचा ई. उपयोग करून घेतो‌.
 माणसांचा उपयोग भगवंताने सुध्दा वेळोवेळी करून घेतला आहे. आयुष्य कसं जगायचं. आदर्श जीवनशैली कशी असावी हे विश्वाला सांगण्यासाठी अर्जुनाला निवडलं. दैवी शक्ती सदैव फक्त विश्व कल्याणाचा विचार करतात.
शब्दांचा उपयोग विचारपुर्वक हवा. शब्दच आधार होतात तर कधी शब्दाला धार असते. उच्चार करताना सुद्धा योग्य आविर्भाव असेल तर त्या भावना व्यक्त करण्याचा उपयोग नाही तर सारं काही व्यर्थ!!!
आयुष्यात असंख्य सात्विकतेचा उपयोग जर केला तर आयुष्य सुंदर, सुखकर, स्पष्ट, नितळ होईल आणि निसर्गाच्या उपयोगी आपली काया यावी हीच काय ती धन्यता आणि नश्वर देहाचा उपयोग!!!
©सौ. श्रध्दा जाधव बोरसे
Ashvini Pande

Recent Posts

ढगाळ वातावरण,दाट धुके व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

ढगाळ वातावरण,दाट धुके व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान...! मनमाड: आमिन शेख गेल्या तीन ते चार दिवसांपासून…

1 day ago

पाच हजारांची लाच घेताना पोलीस जाळ्यात

नाशिक: प्रतिनिधी भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट 2 चा…

2 days ago

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा नाशिक दौरा रद्द

नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…

2 days ago

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन

नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…

3 days ago

शिंदे टोलनाक्यावर कारला आग

शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…

3 days ago

मनपा आयुक्त पदाबाबत मोठा ट्विस्ट, कार्डिलेची बदली रद्द, मनीषा खत्री यांची नियुक्ती

नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…

3 days ago