नाशिक

लसीकरण प्रकरणी तपासाला वेग

‘त्या’ व्हॅक्सिनची तपासणी हिमाचलच्या प्रयोगशाळेत

नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या लसीकरण शिबिरात लस घेतल्यानंतर सतरा वर्षीय श्रावणी अनिल पाटील या मुलीचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. सदर घटनेने शहरासह आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. श्रावणीचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, याचा शोध घेण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार श्रावणीला जे व्हॅक्सिन दिले, त्याची संपूर्ण बॅच अन्न व औषध प्रशासनाने सील करत सदर व्हॅक्सिन सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट (सीआरआय) हिमाचल प्रदेश येथील कसौली या वैद्यकीय संस्थेत तपासणीसाठी पाठवली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने हिमाचलला जे व्हॅक्सिन श्रावणीला दिले होते, ते हिमाचलला धाडले, तर दिंडोरी रोडवरील न्यायवैद्यक प्रयोगशाळा व छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत रक्त, त्वचा व शरीरातील काही नमुनेदेखील तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस प्रशासन, राज्य शासन व महापालिकेचा आरोग्य विभाग व अन्न -औषध प्रशासनाने तपासाला गती दिल्याचे दिसत आहे. दरम्यान, श्रावणीच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून, तो प्राप्त झाल्यास त्यातून मृत्यूचा उलगडा होण्याची शक्यता आहे. सदर प्रकार कोणत्या कारणामुळे झाला, याच्या तपासासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची गुरुवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत ही घटना कोणत्या प्रकारामुळे झाली असेल, यावर मंथन करण्यात आले.

सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट संस्थेविषयी थोडक्यात
सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट कसौली ही हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील एक प्रमुख वैद्यकीय संशोधन संस्था आहे. 3 मे 1905 रोजी स्थापित ही संस्था भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. विशेष म्हणजे, जेव्हा नाशिकसारखी एखादी घटना घडल्यास अशा प्रकरणात तपास करणारी ती भारतातील एकमेव वैद्यकीय संस्था आहे.

ही व्हॅक्सिन कसौली हिमाचल प्रदेशमध्ये पाठविण्यात आली आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात असून, नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करावे व जे नियमित लसीकरण आवश्यक आहे, ते करून घ्यावे.
– डॉ. विजय देवकर, मुख्य आरोग्य अधिकारी, मनपा

Vaccination probe gains momentum

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

6 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

6 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

6 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

7 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

7 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

7 hours ago