नाशिक

वडाळागावातील खंडोबा चौकात किराणा दुकानदारावर कोयत्याने हल्ला

सिडको : विशेष प्रतिनिधी
वडाळागाव येथील खंडोबा चौक परिसरात एका किराणा दुकानदारावर सात जणांच्या टोळीने कोयत्याने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे
आलम मकसूद खान (वय 30, रा. खंडोबा चौक, वडाळागाव) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादी आलम खान यांच्या म्हणण्यानुसार आरोपी तौसिफ, जावेद बाबा, सोनू व चार ते पाच अनोळखी इसम यांनी मोटारसायकलवर येत त्यांना दुकानाबाहेर बोलावले. त्यानंतर आरोपींपैकी एकाने कोयत्याने त्यांच्या अंगावर वार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात आलम खान थोडक्यात बचावले असून, त्यांनी तत्काळ इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

10 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

12 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

26 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

31 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

35 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

47 minutes ago