वासाळी : वार्ताहर
वासाळी (ता. इगतपुरी) येथील मांडवकडा येथे दोन दिवसांपूर्वी एका शेतकर्याच्या घराला आग लागून जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
घरातील संसारोपयोगी वस्तू जळाल्याने हे कुटुंब हतबल झाले होते. याची माहिती प्रभुनयन फाउंडेशन, अंधेरीचे संस्थापक अध्यक्ष आनंद मवाणी, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक राष्ट्रीय समिती नाशिक, साई सहाय्य समिती इगतपुरी यांना मिळताच एक हात मदतीचा या उपक्रमातून नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.
याप्रसंगी श्री साई सहाय्य समितीचे राजूभाऊ देवळेकर यांनी स्वतः मांडवकडा येथे जाऊन नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन दिलासा दिला. लवकरात लवकर पंचनामा करून या कुटुंबाला भरपाई मिळावी, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू, असे देवळेकर, अनिकेत यादव यांनी सांगितले. यावेळी सरपंच सुनीता कोरडे, शांताराम भांगे, लक्ष्मण कोरडे, बाळू कचरे, सीताराम आंबेकर, भोरू धोंगडे आदी उपस्थित होते.
वासाळी येथील शेतकरी कुटुंबाला केलेल्या मदतीमुळे आत्मिक समाधान मिळाले. माझ्या सामाजिक कार्यात मदत करणार्या सर्व सहकार्यांचे आभार मानतो. त्यांच्या सहकार्यातून वंचित घटकांपर्यंत पोहोचता येते. यापुढेही अधिक घटकांना मदत करणार आहोत.
– आनंद मवाणी,
संस्थापक अध्यक्ष, प्रभुनयन फाउंडेशन, अंधेरी
शेतकर्याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…
समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…
बांधकामांवर पाण्याचा वारेमाप वापर, सिंहस्थ कुंभमेळ्यावरही परिणाम त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी पावसाने वेळेआधीच माघार घेतल्याने आणि…
निफाड : तालुका प्रतिनिधी यंदा अत्यल्प पाऊस असतानाही शेतकर्यांनी महागडी औषधे, कीटकनाशके व पोषकांची फवारणी…
नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…