प्रत्येकाला काही ना काही दुःखाने ग्रासले आहे. सर्व काही असूनही माणूस कधीच समाधानी नसतो. माणसाच्या मनाची तशी अवस्थाच आहे. एक गोष्ट मिळाली, की पुढच्या गोष्टीसाठी त्याच्या मनात इच्छा उत्पन्न होते, आणि इच्छा पूर्ण झाली नाही, की दुःख होतं. दुःख हे दुसऱ्याचं सुख पाहूनही होते, तर कधी आपण इतरांपेक्षा मागे पडलो आहोत. यामुळे दुःखाने ग्रासले जातो.
माणसाला कुठल्या गोष्टीचा दुःख होईल. हे सांगणे आणि माणसाला नक्की कुठल्या गोष्टीचा दुःख आहे. त्याची दुखरी नस कुठली हे कुणीच सांगू शकत नाही. सहवासातील व्यक्तीही त्याच्या मनाचा ठाव घेऊ शकत नाही.
दुःखी असलेली व्यक्ती आपल्या आसपासच्या लोकांनाही दुःख देते. दुःख दुसऱ्याला देतो म्हणूनच कदाचित दुःख मिळत असावं असा बऱ्याच लोकांचा समज असतो पण तसे नाही. काही वेळा इतरांना जास्त सुख वाटल्यामुळे ही आपल्या पदरात दुःख येतं त्यामुळे इतरांना किती सुख वाटावं, कुणाला सुख वाटावं याचा विवेक नक्कीच धरता आला पाहिजे. चांगुलपणा कुठे थांबवायचा हे ही कळायला हवंच.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक तरी अशी वेळ येतेच. जेव्हा त्याला भावनिक आधाराची गरज पडते. ज्या व्यक्तीला जेव्हा कुठुनही आधार मिळत नाही, त्यावेळी निसर्गचं काही वेळा शुध्द मनाच्या जीवांसाठी कुणाला ही माध्यमं बनवून त्या व्यक्तीला दुःखाच्या दरीतुन बाहेर काढते.
दुःख एकमेकांना एकमेकांच्या जवळ आणते, आणि सुख एकमेकांना एकमेकांपासून दूर घेऊन जाते. मग सुख नक्की मित्र की शत्रु… पण एक खरं दुःख भोगल्याशिवाय सुखाची किंमत शुन्यच. जेवणात जसं मीठ गरजेचे तसेच आयुष्यात दुःख ही सुखाची किंमत काय आहे. हे समजण्यासाठीच येत असावं
दुःख कोणाच्याही नशिबात जात नाही, कारण सगळ्यांकडे सहनशक्ती असतेच असं नाही. ज्यांच्या वाट्याला दुःख येतं त्यांना जीवनातील चढ उताराचा, अडचणी, समस्या हाताळताना आयुष्य सुंदरपणे जगण्याचा खरा अर्थ समजलेला असतो. कारण दुःखातच माणुस अधिक आत्मपरीक्षण करत असतो.
ज्यांच्या वाट्याला दुःख येतं तीच व्यक्ती महान होतात. फक्त दुःखाकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यापक असवा. त्यात ही स्विकार महत्वाचा… कारण दुःखाकडून काहीतरी शिकायला मिळत असते.
काही व्यक्ती दुःखाला कुरवाळत नाही. त्याला आपलं मानतात. दुःख, यातना, विवंचना इ. यांना स्विकारतात. पुढे मार्गस्थ होतात. दुःखाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनच वेगळा असतो. आपल अस्तित्व घडवण्याचं काम निसर्ग, ईश्वरी शक्ती दुःखाच्या रूपात करत असते.
इतर लोकांना सगळं काही मिळतं, पण निसर्गाची साथ दैवी शक्तीची साथ मिळत नाही. परंतु जेव्हा बावनकशी सोन्यासारख्या लोकांच्या आयुष्यात दुःख येते, तेव्हा त्यांच अस्तित्व दुःखाने झळाळून निघते.
दुःखातच माणसांचे खरे चेहरे आपण ओळखू शकतो. जेव्हा आपण सांगतो की, मी अडचणीत आहे. तेव्हा खरंच कोण आपल आहे. याची ओळख आपल्याला नव्याने होते. खर तर ती परिक्षा असते माणसाच्या जन्माला येऊन माणुसकी दाखवण्याची… खरोखरच आपली असणारी नाती किती आपली आहे. याची समज दुःख, अडचणीतच येते.
हजार अनुभवांच्या कथांपेक्षा सरळ चालतांना लागलेली ठेच माणसाला आयुष्यभर सरळ आणि चौकस पणाने निरिक्षण, विचार करून पुन्हा सरळ चालायला भाग पाडते.
काही गोष्टी ह्या स्वतः भोगल्यावर किंवा जो पर्यंत स्वतः वर वेळ येत नाही किंवा सोसल्याशिवाय दुःख काय आहे हे कळत नाही. म्हणुन तर म्हणतात ना की, जावे त्यांच्या वंशा…
काही लोक स्वतःच्या प्रारब्धात असलेल्या गोष्टीचा हिशोब ही देवाच्या नावाने लिहिताना दिसतात. सर्वांना माहीत आहेच की मनुष्याच्या रुपात देवाने ही सगळं भोगलेच आहे मग आपली काय गणना???
निसर्गान जर दैवी शक्तीला ही दुःखाची दरी पाहायला लावली तर आपण तर अगदीच पायधूळ आहोत. पण एक नक्की की दुःखाची दरी पार करताना अनेक चांगले वाईट अनुभव येतात आणि मग सुखाचा डोंगर दिसतो. तेव्हा त्याला पाहण्याच सुख अवर्णनीय. शेवटी काय रडून हसण्याची मजाच काही औरच!!!
©सौ. श्रध्दा जाधव बोरसे
ढगाळ वातावरण,दाट धुके व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान...! मनमाड: आमिन शेख गेल्या तीन ते चार दिवसांपासून…
नाशिक: प्रतिनिधी भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट 2 चा…
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…