नाशिक

वनप्रस्थ फाउंडेशनचा आई भवानी डोंगरावर पर्यावरण महोत्सव

लिग्रा इंडस्ट्रीजच्या सहकार्यातून महावृक्षारोपण

सिन्नर ः प्रतिनिधी
येथील वनप्रस्थ फाउंडेशन, माळेगाव येथील लिग्रा इंडस्ट्रीज लिमिटेड आणि सोनांबे येथील आई भवानी वृक्षप्रेमी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सिन्नर-घोटी रस्त्यावरील आई भवानी डोंगरावर पर्यावरण महोत्सवांतर्गत महावृक्षारोपण करण्यात आले.
माजी जि. प. सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून तसेच लिग्रा इंडस्ट्रीजचे युनिट हेड संजीव
महापात्रा, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे संस्थापक नारायण वाजे यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे पूजन करून
महावृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी लिग्रा इंडस्ट्रीजच्या एच. आर. हेड सुचिता अकोलकर, संजीव
माथुर, विशाल हिंगमिरे, जगदीश जाधव, नीना गाडेकर, युनियन प्रतिनिधी विलास खताळे आदींसह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, वृक्षप्रेमी यांच्यासह वनप्रस्थ फाउंडेशन व आई भवानी वृक्षप्रेमी संस्था, सोनांबे, ढग्या डोंगर संवर्धन समिती, वृक्षमित्र फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिन्नर-घोटी रस्त्यावरील आई भवानी डोंगरावर
सुमारे आठ वर्षांपासून वनप्रस्थ फाउंडेशनचे कार्यकर्ते वृक्षारोपण आणि वर्षभर संवर्धन करीत आहेत. आतापर्यंत वनप्रस्थच्या कार्यकर्त्यांच्या श्रमातून या ठिकाणी सुमारे 75 पेक्षा अधिक प्रजातींची, सुमारे 8500 पेक्षा अधिक झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. केवळ वृक्षारोपण हा हेतू डोळ्यासमोर न ठेवता संस्थेचे कार्यकर्ते रोज सकाळी दोन तास भल्या पहाटे या सर्व झाडांचे नियमितपणे संगोपन देखील करत आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी गतवर्षी या झाडांसाठी सिन्नर विभागीय दूध संघाच्या डेअरी वरून पाण्याचीदेखील व्यवस्था करून दिलेली आहे. त्यासाठी दीपक बजाज यांनी इंडस पाइप्स आणि फिडेल पंप्स यांच्या माध्यमातून सुमारे एक किलोमीटर अंतराचा पाइप आणि मोटारदेखील उपलब्ध करून दिलेली आहे. यामुळे या परिसरात लावलेल्या झाडांना नवसंजीवनी प्राप्त झाली असून, त्यामुळे संस्थेच्या कार्यकर्त्यांचे पाणी वाहून नेण्याचे श्रमदेखील वाचले आहे आणि येथे लावलेल्या झाडांचे संवर्धन करणे हे सुलभ झालेले आहे.
माळेगाव एमआयडीसीतील लिग्रा इंडस्ट्रीज लिमिटेडदेखील सुमारे पाच वर्षांपासून वनप्रस्थ फाउंडेशनच्या सोबत वृक्षारोपण आणि संवर्धनाचे काम करत आहेत. कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत वनप्रस्थ फाउंडेशनला हजारो रोपे आणि संवर्धनासाठी आवश्यक असणारे विविध यंत्र – साहित्य प्रदान करण्यात आले.
यावेळी पतसंस्था संघावर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सुमन सोपान बोडके, समृद्धी पतसंस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मनोज भंडारी, अथर्व शेलार याची एमबीबीएससाठी निवड झाल्याबद्दल, तसेच विविध परीक्षांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अपूर्व बोर्‍हाडे, साक्षी खिंवसरा, अदिती भंडारी, सौरभ आहेर, कुणाल बोडके, मुक्ता देशमुख, साई खर्डे, वैष्णवी बोडके, श्रावणी बोडके, विशाखा बोर्‍हाडे आदी सर्वांचा सत्कार करण्यात आला. या पर्यावरण महोत्सवाच्या अंतर्गत आगामी सप्ताहामध्ये ज्या व्यक्ती, सामाजिक संस्था, ग्रुप आणि विद्यार्थी गट यांना वृक्षारोपण करायचे आहे, त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन वनप्रस्थ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Gavkari Admin

Recent Posts

अशोकनगरमध्ये १६ वर्षीय  मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ

अशोकनगरमध्ये १६ वर्षीय  मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…

3 days ago

मालेगाव शहरात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…

3 days ago

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा डंका

श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…

3 days ago

डॉ. नीलम रहाळकर यांचे उद्या ‘अरंगेत्रम्’; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना

डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…

3 days ago

कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ

कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…

4 days ago

कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले पण खाते बदलले, आता हे खाते

मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…

5 days ago