पंचवटी : वार्ताहर
पंचवटीतील मखमलाबाद नाका परिसरात बुधवारी (ता.28) टवाळखोरांनी वाहनांवर दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दोन वाहनांचे नुकसान झाले असून, एकाची मागील काच, तर दुसर्या वाहनाचा आरसा फोडला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास करत
आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मखमलाबाद नाका परिसरात अजित चौधरी आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. मंगळवारी (दि.27) त्याचे चारचाकी वाहन (एमएच 15-जीआर 2214) हे मखमलाबाद नाका परिसरातील विठाई हॉस्पिटलसमोरील बाजूस रस्त्यावर पार्क केले होते. बुधवारी (दि.28) रोजी सकाळी कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी आपल्या वाहनाजवळ गेले असता, चौधरी यांना टवाळखोरांनी त्यांच्या वाहनाची मागील काच फोडलेली आढळली.
तसेच ते राहत असलेल्या इमारतीतील एका कुटुंबाकडे आलेल्या नातेवाइकांच्यादेखील चारचाकी वाहनाचा उजव्या बाजूला असलेला आरसा तोडलेला दिसला. या परिसरात अनेक जुन्या इमारती असून, मोठ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्याने सर्व वाहने रस्त्यावर कडेला लावली जातात.
गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी चौधरी हे आपले वाहन लावत असून, यापूर्वी कधीच असा प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले.
गोदापार्क परिसरात टवाळखोरांचा वावर
मखमलाबाद नाक्यापासून हाकेच्या अंतरावर गोदापार्क आहे.
या गोदा पार्कच्या आजूबाजूला मद्यपी व नशा करणार्यांचा वावर
कायम दिसून येतो. याठिकाणी त्यांचे अड्डे तयार झाले असल्याचे
नागरिकांकडून बोलले जाते. त्यामुळे या भागात पोलिसांनी गस्त
वाढवून टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून
केली जात आहे.
साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…
नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…
शहापूर: साजिद शेख पन्नास हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन…
फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला शहापूर : साजिद शेख एका…
अलिशान वाहनातून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड दोघांवर गुन्हा, 11 लाख रुपयांचा ऐवज वाहनासह जप्त दिंडोरी…
उज्ज्वल निकम होणार खासदार नाशिक: प्रतिनिधी 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यात महत्वपूर्ण कामगिरी…