नाशिक

जाहिरात होर्डिंग्जवर आता क्यूआर कोड सक्तीचा

अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिका आयुक्तांचे निर्देश

नाशिक : प्रतिनिधी
अनधिकृत होर्डिंग्जवर नियंत्रण आणण्याकरिता महापालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यापुढे शहरात कोणतेही जाहिरातीचे होडिर्ंग्ज लावायचे असेल तर त्यावर क्यूआर कोड टाकणे आवश्यक असेल. अन्यथा संबंधित होडिर्ंग्ज अनधिकृत समजून त्या व्यक्तीला तीन हजारांचा दंड ठोठावला जाईल. याबाबतचे आदेश मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी काढत त्यानुसार कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून शहरात अनधिकृत होडिर्ंग्जचा बाजार झाला आहे. राजकीय पक्ष, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा संस्थांचे चौकाचौकांत असलेल्या होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश असूनही मनपा प्रशासन कारवाई करत नसल्याचे चित्र होते.
आता आयुक्त खत्री यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार जाहिरात परवाने विभागाने 181 जागा निश्चित केल्या आहेत. या ठिकाणांची यादी मनपाचे संकेतस्थळावर व सर्व विभागीय कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यानुसार ज्यांना होर्डिंग्ज अथवा फलक उभारायचे असल्यास विभागीय कार्यालयाच्या नागरी सुविधा केंद्रात विहित मुदतीत रीतसर अर्ज दाखल करून संबंधित विभागाची परवानगी प्राप्त करावी. होर्डिंग्जवर अर्जदाराचे नाव, परवानगी क्रमांक, परवानगी दिलेले ठिकाण व परवानगीचा कालावधी माहिती असणारा क्यूआर कोड दर्शनी भागावर प्रदर्शित करण्यात यावा. तरच ते अधिकृत मानण्यात येईल. छपाई करणारे छपाईदार जाहिरात फलकांची छपाई करून मनपा, खासगी जागेत विनापरवाना जाहिरात लावण्याचे काम करतात. मात्र, जाहिरातधारकांनी मनपाची परवानगी घेतलेली आहे की नाही, याची शहानिशा करत नाहीत. यापुढे त्यांनी परवाना असल्याची खात्री करूनच छपाई करावी. अन्यथा अशा छपाईदारांवरही महापालिका कररवाई करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

अंमलबजावणी व्हावी

मनपा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

शहरातील सहाही विभागांत अक्षरश: अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट झाला आहे.

भाऊ, दादा, आप्पा, अण्णाच्या होर्डिंग्जचा तिटकारा सामान्य नागरिकांना येतो.

मात्र, आजवर याप्रकरणी महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आले आहे.

परंतु आता जाहिरातीसाठी क्यूआर कोड आवश्यक केल्याने यानिमित्ताने तरी

अनधिकृत होर्डिंग्जला लगाम बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago