महाराष्ट्र

मखमलाबाद नाका परिसरात वाहनांची तोडफोड



पंचवटी : वार्ताहर

पंचवटीतील मखमलाबाद नाका परिसरात बुधवारी (ता.28) टवाळखोरांनी वाहनांवर दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दोन वाहनांचे नुकसान झाले असून, एकाची मागील काच, तर दुसर्‍या वाहनाचा आरसा फोडला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास करत
आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मखमलाबाद नाका परिसरात अजित चौधरी आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. मंगळवारी (दि.27) त्याचे चारचाकी वाहन (एमएच 15-जीआर 2214) हे मखमलाबाद नाका परिसरातील विठाई हॉस्पिटलसमोरील बाजूस रस्त्यावर पार्क केले होते. बुधवारी (दि.28) रोजी सकाळी कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी आपल्या वाहनाजवळ गेले असता, चौधरी यांना टवाळखोरांनी त्यांच्या वाहनाची मागील काच फोडलेली आढळली.
तसेच ते राहत असलेल्या इमारतीतील एका कुटुंबाकडे आलेल्या नातेवाइकांच्यादेखील चारचाकी वाहनाचा उजव्या बाजूला असलेला आरसा तोडलेला दिसला. या परिसरात अनेक जुन्या इमारती असून, मोठ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्याने सर्व वाहने रस्त्यावर कडेला लावली जातात.
गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी चौधरी हे आपले वाहन लावत असून, यापूर्वी कधीच असा प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले.

गोदापार्क परिसरात टवाळखोरांचा वावर

मखमलाबाद नाक्यापासून हाकेच्या अंतरावर गोदापार्क आहे.

या गोदा पार्कच्या आजूबाजूला मद्यपी व नशा करणार्‍यांचा वावर

कायम दिसून येतो. याठिकाणी त्यांचे अड्डे तयार झाले असल्याचे

नागरिकांकडून बोलले जाते. त्यामुळे या भागात पोलिसांनी गस्त

वाढवून टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून

केली जात आहे.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago