‘मविप्र’तर्फे शिवजयंती सोहळा : शिवस्मारकात अवतरली शिवशाही
नाशिक : प्रतिनिधी
डोक्यावर भगवे फेटे…हातात भगवे झेंडे…कपाळावर चंद्रकोर…आणि पारंपरिक वेशभूषेत आलेल्या मविप्र संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले पोवाडे, शिवगर्जना आणि शिवगीतांनी सीबीएस परिसरातील शिवस्मारक परिसर दणाणून गेला. निमित्त होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्याचे.
श्री छत्रपती शिवाजी स्मारक समिती व मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयासमोरील शिवस्मारकात या भव्य शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक मनपाच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते मंत्रोच्चारात विधिवत शिवपूजन झाले व शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयजयकार करण्यात आला.
याप्रसंगी श्री छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, माणिकराव बोरस्ते आदींसह संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, संदीप गुळवे, अॅड. लक्ष्मण लांडगे, शिवाजी गडाख, नंदकुमार बनकर, विजय पगार, डॉ. अशोक पिंगळे, डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव, डॉ. विलास देशमुख, प्रा. दौलत जाधव, डॉ. के. एस. शिंदे, डॉ. अजित मोरे, प्रा. शशिकांत मोगल, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व सेवक उपस्थित होते. सविता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. निखिल होन यांनी पौरोहित्य केले. याप्रसंगी छत्रपती सेनेतर्फे मविप्र संस्थेच्या सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाचा सन्मान करण्यात आला.
Vigil of Powade, Shiva Garjana and Shiva Geet at Shiv Smarak
कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…