नाशिक

महापौर, उपमहापौरसाठी आज मतदान

हिमगौरी आडके ठरणार भाजपच्या दुसर्‍या महिला महापौर; उबाठा, शिंदेसेनेचे आव्हान केवळ औपचारिकताच

नाशिक : प्रतिनिधी
राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक आज शुक्रवारी (दि.6) पार पडणार आहे. महापालिकेतील सभागृहात सकाळी अकरा वाजता महासभेतून नाशिकचा महापौर व उपमहापौर पदाची निवड नगरसेवकांद्वारे केली जाणार आहे. भाजपने महापौरपदासाठी हिमगौरी आडके तर उपमहापौरसाठी मच्छिंद्र सानप यांची घोषणा केली होती. दरम्यान, भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने उद्धवसेनेने व शिंदेसेनेने दिलेले आव्हान औपचारिकताच ठरणार आहे.
नाशिक महानगरपालिकेमध्ये 122 जागांपैकी 72 जागा जिंकून भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. नंबर दोनचा पक्ष शिंदेसेना ठरला असून, या पक्षाचे 26 नगरसेवक निवडून आले आहेत. तर उद्धवसेनेचे 15, राष्ट्रवादी (अ.प.) पक्ष 4, काँग्रेस तीन, मनसे एक व अपक्ष एक यानुसार पक्षीय बलाबल आहे. दरम्यान, मंगळवारी भाजपने महापौर व उपमहापौर पदाचे नाव जाहीर केले होते. त्यानंतर आता महापौरपदासाठी घेतल्या जाणार्‍या मतदान प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. स्पष्ट बहुमत असल्याने भाजप निवांत दिसून येत आहे. नगरसेवकांना त्यांनी गुरुवारी अज्ञातस्थळी नेल्यानंतर शुक्रवारी नगरसेवकांना थेट मनपा मुख्यालयात आणले जाणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली महापौरपदाची निवडणूक होणार आहे. महापौरचा फैसला होताच उपमहापौरची नियुक्ती केली जाणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वांत जास्त जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे भाजपचाच महापौर होणार, हे निश्चित असतानाही निवडणूक बिनविरोध नको म्हणून उद्धवसेनेच्या सीमा पवार यांनीदेखील महापौरपदाचा अर्ज भरला आहे. तर भाजपचा मित्रपक्ष असलेला मात्र मनपा निवडणूक स्वबळावर लढलेल्या शिंदेसेनेनेदेखील उपमहापौरपदाचा अर्ज भरला आहे. विशेषत: एकाच पदासाठी विलास शिंदे, प्रवीण तिदमे व राहुल दिवे यांनी अर्ज भरल्याने शिंदेसेनेतील गटबाजी चर्चेत आली आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

3 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

3 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

4 hours ago