सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर नगरपरिषदेच्या रखडलेल्या तीन जागांसाठी आज, शनिवारी (दि. 20) मतदानाचा दिवस उजाडला आहे. प्रभाग क्रमांक 2-अ, 4-अ आणि 10-ब या जागांसाठी आज (दि.20) सकाळी साडेसातपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या तिन्ही जागांसाठी एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत.
शुक्रवारी तहसील कार्यालयातून संबंधित प्रभागांतील 12 मतदान केंद्रांसाठी निवडणूक कर्मचारी मतदान साहित्य घेऊन रवाना झाले होते. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधील 3330, प्रभाग क्रमांक 4 मधील 3470 तर प्रभाग क्रमांक 10 मधील 4023 असे एकूण 10 हजार 823 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकामुळे काही प्रभागांची निवडणूक लांबणीवर पडली होती. दरम्यान, प्रभाग क्रमांक 5-अ मध्ये उदय गोळेसर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर उर्वरित तीन जागांसाठी शनिवारी मतदान होत आहे. तीनही जागांसाठी शांततेत व पारदर्शक पद्धतीने मतदान होण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, मतदान साहित्य वेळेत केंद्रांवर पोहोचविण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित नाईक व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित कदम यांनी दिली.
रविवारी होणार मतमोजणी
शनिवारी (दि. 20) होणार्या मतदानानंतर नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या सर्व जागांची मतमोजणी रविवारी (दि. 21) होणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया सिन्नर तहसील कार्यालयात पार पडणार आहे.
Voting for three Sinnar Municipality seats today
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…
शेतकर्याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…
समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…
बांधकामांवर पाण्याचा वारेमाप वापर, सिंहस्थ कुंभमेळ्यावरही परिणाम त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी पावसाने वेळेआधीच माघार घेतल्याने आणि…