मनमाडच्या पोलिसाकडून पत्नी, सासू, सासर्‍यावर चाकूने सपासप वार

सिन्नर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत माहेरून पैसे आणत नाही. म्हणून संतापलेल्या पोलिसाने पत्नी, सासू, सासर्‍यावर चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना मनमाड येथे घडली. मनमाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सूरज उगलमुगले याने चाकूने वार केल्यामुळे पत्नी पूजा, सासरे निवृत्ती सांगळे आणि सासू शीला सांगळे हे तिघेही जखमी झाले. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उगलमुगले याची सासूरवाडी दोडी येथे आहे. त्याने तिघांच्या हात, पाय, पोटावर चाकूने वार केल्यामुळे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. सांगळे यांनी यापूर्वीच पोलिसांत उगलमुगले विषयी तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने हा प्रकार घडल्याचे सांगळे यांचे म्हणणे आहे.

One thought on “मनमाडच्या पोलिसाकडून पत्नी, सासू, सासर्‍यावर चाकूने सपासप वार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *