नाशिकरोडला बर्निंग कारचा थरार
नाशिकरोड : प्रतिनिधी 
नाशिकरोडच्या चेहडी शिव येथे बर्निंग कारचा थरार पाहावयास मिळाला. सिन्नरकडून नाशिकरोडकडे येणाऱ्या चालत्या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने  यात कोणतीही हानी चार चाकीतील व्यक्तींना झाली नाही. प्रसंगावधान राखून कार चालकाने वेळीच त्याच्या कुटुंबाचे प्राण वाचविले. नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या चेहडी शिव येथे हा प्रकार घडला. गाडीने अचानक पेट घेतल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली.  कार चालक कुमार वाध्वनी हे आपली होंडा सिटी कार क्रमांक (एम एच 02 बी जे 99 87) या गाडीने सिन्नर कडून नाशिक रोड कडे येत असताना चेहेडी शीव येथील उड्डाणपुलाजवळ कार च्या इंजिन अचानक पेट घेतला. आग लागल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली नाही. परंतु आजूबाजूच्या दुकानदारांच्या व नागरिकांच्या सदरची घटना लक्षात आली व त्यांनी कार चालकाला याबाबत सावध केले त्यानंतर कारचालक वाद्वानी यांनी तातडीने कार थांबवली व प्रथम पत्नी व मुलाला बाहेर काढले व स्वताचा आणि कुटुंबाचा जीव वाचविला त्यानंतर कार ने मोठ्या प्रमाणात पेट घेतला व काही क्षणात कार जळाली व त्यामुळे मोठे नुकसान झाले त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझवली सदरची घटना नाशिक रोड अग्निशामक दलाला समजतात पाण्याचा बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाला व त्यांनी पाण्याचा मारा करून ही आग नियंत्रणात आणली. दरम्यान काही दिवसापूर्वीच ओढा जवळ देखील याच पद्धतीन चालत्या गाडीला आग लागून यात भस्मसात झाली होती. मागील काही दिवसांपासून कडक ऊन पडत असल्याने गाड्या पेट घेत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे चालकांनी गाडी चालवताना याची काळजी खबरदारी घेणे आवश्यक आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *