सिन्नर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत माहेरून पैसे आणत नाही. म्हणून संतापलेल्या पोलिसाने पत्नी, सासू, सासर्यावर चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना मनमाड येथे घडली. मनमाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सूरज उगलमुगले याने चाकूने वार केल्यामुळे पत्नी पूजा, सासरे निवृत्ती सांगळे आणि सासू शीला सांगळे हे तिघेही जखमी झाले. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उगलमुगले याची सासूरवाडी दोडी येथे आहे. त्याने तिघांच्या हात, पाय, पोटावर चाकूने वार केल्यामुळे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. सांगळे यांनी यापूर्वीच पोलिसांत उगलमुगले विषयी तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने हा प्रकार घडल्याचे सांगळे यांचे म्हणणे आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…