आईच्या दशक्रियेला गेला अन्

आईच्या दशक्रियेला गेला अन…

लासलगाव : प्रतिनिधी
आईच्या वियोगाच्या दु:खात असतानाच दशक्रियेसाठी सगळे कुटुंब परगावी गेले. आणि इकडे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून 68 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून लंपास केल्याची घटना घडली.या घरफोडीत 38 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने तर रोख 30 हजार रुपये चोरून अज्ञात चोरट्यानी पोबारा केला.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी भाऊसाहेब रुंजा पवार राहणार मरळगोई,हल्ली मुक्काम किल्ल्याच्या पाठीमागे,लासलगाव हे घराला कुलूप लावून त्यांच्या आईचा दशक्रिया विधी करण्यासाठी कुटुंबासह मरळगोई येथे गेले असता अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला व घरातील शोकेस चे लॉकर तोडून 30 हजार रुपये रोख तसेच 11 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी,5 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे झुमके,5 हजार 500 रुपये किमतीचे वेल व लटकन,16 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र असलेली पोत असा एकुन 68 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून पोबारा केला.
या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल वाघ हे पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले व आजूबाजूला असलेल्या सी सी टी व्ही आधारे तपासकार्य सुरू केले.या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक उपनिरीक्षक सुराशे करत आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago