दहेगावकर पाण्यापासून वंचित; महिलांची भटकंती
दिंडोरी : प्रतिनिधी
‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ अशी म्हणण्याची वेळ दहेगाव येथील महिलांवर आली आहे. कोणी पाणी देतं का पाणी, अशी आर्त हाकही देण्यात आली. येथील महिलावर्गाची अवस्था पाहून थेट सरपंचांनी गावात पाण्याचे टँकर बोलावून काहीशी पाणी समस्या सोडविली आहे.
दहेगावात हाकेच्या अंतरावर धरण असूनही येथील महिलांनी गावाला आठ दिवसांपासून पाणी नाही. यानंतर नाइलाजास्तव येथील सरपंचांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. गावातील बोअरवेलचे पाणी आठ दिवसांपूर्वी संपले आणि दुसरा पर्याय हा ओझरखेड धरण हा आहे; परंतु जिथे पाणीपुरवठा योजना आहे, ती संपूर्ण पाण्यात आहे. शासनाच्या संबंधित अधिकार्यांचे आभार मानले पाहिजे. ते असे जेव्हा एक रोटेशन जाईल तेव्हा धरणाची ती योजना सुरू होते आणि धरणाचे शेवटचे रोटेशन जाईल, तेव्हा परत ती योजना कोरडी पडते, अशी स्थिती आहे. आम्हाला नवीन जलजीवन योजना मंजूर करावी, त्यासाठी जागादेखील ग्रामस्थांनी दिली आहे आणि जी कागदपत्र आवश्यक आहे, त्याचीही संपूर्ण पूर्तता केली आहे. अद्याप गावातील योजनेला मंजुरी दिलेली नाही, याबाबत सत्य स्थिती जाणून घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी सरपंच अजित कड यांनी केली आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…