महाराष्ट्र

बिबट्याला पळवून लावण्यासाठी बनवली गन

कोकणगावच्या विद्यार्थ्याची कल्पकता; विज्ञान प्रदर्शनात कौतुक

दिक्षी : वार्ताहर
निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील आठवीचा विद्यार्थी अमोल गायकवाड याने बिबट्या दिसतात एक शक्कल लढवली आहे. त्याने एक बंदूक तयार केलेली आहे, तीदेखील टाकाऊपासून टिकाऊ. त्यामध्ये तार किंवा एखादी टोकदार वस्तू आपल्याला बंदुकीची गोळी म्हणून वापरता येते. त्याने सांगितले की बिबट्या आहे; परंतु त्याला मारायचे नाही.
केवळ त्याला घाबरवायचे आहे आणि लांब पळून गेला पाहिजे. त्यासाठी त्याने बंदूक तयार केलेली आहे. या बंदुकीच्या सहाय्याने लांबून आपल्याला बिबट्याला घाबरवता येऊ शकते. त्याचे या प्रोजेक्टचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला शाळेतल्या विज्ञान शिक्षिका गीतांजली जाधव व ज्ञानेश्वरी तासकर यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक मधुकर पवार यांनीदेखील त्याचे विशेष कौतुक केले. अत्यंत कमी खर्चात त्याने ही गन बनवलेली आहे.
यात एकच छान की बिबट्याला मारायचे नाही, फक्त घाबरवायचे आहे. आपल्यापासून लांब पळवायचे आहे. त्या गनमध्ये दोन छोट्या गनदेखील त्याने ठेवता येईल, अशी जागा केलेली आहे. खूपच जवळ बिबट्या आला तर त्या छोट्या गनचा वापर आपल्याला करता येईल, असे
तो म्हणतो.

मला जेव्हा गावामध्ये बिबट्या दिसला तेव्हा सगळे घाबरायला लागले. मग घरात काही पाइप पडले होते. त्याचा वापर करून मी सेलोटेपला पाइप जोडले आणि एक रबर बँडचा वापर केला. जेणेकरून खूप लांबपर्यंत माझी बंदुकीची गोळी त्या बिबट्याला स्पर्श करेल आणि बिबट्या घाबरून पळून जाईल, असा विचार मनात आला आणि प्रत्यक्ष मी प्रोजेक्ट बनवले.
– अमोल गायकवाड, विद्यार्थी

बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन देण्यासाठी ही गन अत्यंत उपयोगी ठरेल. कमीत कमी खर्चात तयार केलेली बंदूक नक्कीच प्रत्येकाच्या घरात पाहिजे. अमोलला ही कल्पना सुचली त्याबद्दल मी अमोलचे अभिनंदन करते आणि खर्‍या अर्थाने अमोल विज्ञान शिकतो आहे, असे मला आज वाटत आहे.
-गीतांजली जाधव, विज्ञान शिक्षिका

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

7 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

7 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

7 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

7 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

7 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

7 hours ago