Incoming call. White smartphone with call screen. Answer the phone concept. Human hand holding cellphone, finger touching screen. Modern flat design graphic elements and objects. Vector illustration
आपत्ती कक्षाकडे गंगापूर गावातून फोन; मदतीची मागणी, भिंत कोसळण्यासह पंधरा झाडे पडली
नाशिक : प्रतिनिधी
साहेब, आमच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे. आजुबाजुच्या परिसरातही पाणी आहे. लवकर तुम्ही मदत करा… शहरातील रविवार पेठ येथे आमच्या घराची भिंत कधीही कोसळू शकते. तत्काळ कार्यवाही करावी, यासह शहरातील विविध भागांत गुरुवारी (दि.19) रस्त्यावर, पार्किंगमध्ये, वीजवाहिन्यांवर झाडे उन्मळून पडली. यावेळी नागरिकांनी महापालिकेत 1 जूनला स्थापन केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात फोनद्वारे मदतीची मागणी करत होते.
नाशिकमध्ये गुरुवारी (दि. 19) पावसाने जोरदार बॅटिंग करत शहराला चांगलेच झोडपून काढले. पहाटे साडेतीनपासून सुरू झालेल्या पावसाने दुपारी एकपर्यंत दमदार हजेरी लावली. परिणामी गोदावरीला हंगामातील व जूनमधील पहिलाच पूर आला. नऊ तासांत 60 मिलिमीटर पावसाची नोंद केली गेली. सराफ बाजारातील व्यावसायिकांची तारांबळ होऊन त्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांचे दुकान अर्धवटच लावले गेल्याने यात आर्थिक नुकसान झाले. गंगापूर गावातील मुरीद मस्जिद भागातून नरेंद्र तहार यांनी महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्षात फोन करून त्यांच्या घरात पाणी शिरल्याचे सांगून मदत करण्याची मागणी केली. हा परिसर सातपूर विभागात येत असल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्षाने विभागीय अधिकार्यांसह तेथील अधिकार्यांना माहिती दिली.
दुसर्या एका घटनेत रविवार पेठ येथील रहिवासी संतोष तानाजी मोरे यांनी त्यांच्या घराची भिंत कमकुवत झाल्याचे सांगून कार्यवाहीची मागणी केली. गंगापूर रोडवरील लोकमान्यनगरमध्ये पिंगळे फार्म येथील सप्तरंग सोसायटी येथील मोहन पिंगळे यांच्या घरात गटारीचे पाणी शिरल्याची तक्रार करत उपाययोजनेची मागणी केली. घरात पाणी शिरण्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे पंधरा ठिकाणी झाडे पडल्याचेही फोन आले.
यात इंदिरानगरमधील सुकदेव शाळेमागे गोदावरी दर्शन अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये चारचाकीवर गुलमोहराचे झाड कोसळले. दिंडोेरी रोडवरही रस्त्यात गुलमोहराचे झाड पडले. नाशिकरोडच्या सुभाष रोड परिसरात थेट वीजवाहिन्यांवर झाड पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली जाते. या माध्यमातून नागरिकांना मदत करून सुरक्षास्थळी
हलविले जाते.
’त्या’ दोनशे झोपडपट्ट्यांना भीती
सातपूर येथील आयटीआय पुलाजवळून जाणार्या नंदिनी नदीच्या प्रवाहाचे पाणी पात्राबाहेर येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेजारी असलेल्या दोनशे झोपडपट्ट्यांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे मनसेच्या निर्मला पवार यांनी आपत्ती कक्षात फोन करून कार्यवाहीची मागणी केली.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…