नाशिक

धरणांवर ‘आभाळमाया’

जलसाठ्यात 10 टक्के वाढ, विसर्ग सुरू

नाशिक : प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दोन दिवसांत झालेल्या मुसळधारेमुळे धरणांच्या साठ्यात 10 टक्क्यांंनी वाढ झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील धरणांत 25 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. आता त्यात वाढ होऊन 35 टक्क्यांंवर पोहोचला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जिल्ह्यातील विविध धरणांतून विसर्ग करण्यात येत आहे. यंदा मॉन्सून वेळेवर दाखल झाला आहे. जिल्ह्यात मे महिन्यातही जोरदार अवकाळी पाऊस झाला होता.
दरम्यान, जिल्ह्यातील विविध धरणांतून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीला हंगामातील पहिला पूर आला आहे.

गंगापूर धरण 65 टक्क्यांवर

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणातील साठा 65.38 टक्क्यांंवर पोहोचला आहे. त्यामुळे नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मंगळवारी गंगापूर धरणात 45.31 टक्के साठा होता. दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या साठ्यात 10 टक्के वाढ झाली आहे.

धरण समूहात 10 टक्क्यांंनी वाढ

दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरण समूहात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यातील धरण समूहात 25 टक्के साठा होता. आता वाढ होऊन 35.68 टक्क्यांंवर जलसाठा पोहोचला आहे.

 संख्या            क्षमता             आजचा उपयुक्त पाणीसाठा          टक्के

मोठे प्रकल्प          07                48,004
मध्यम प्रकल्प      17                 17,660               23,426                                      35.68
एकूण प्रकल्प        24               65,664

 

या धरणांतून सायंकाळी
6 वाजता (दि. 20) विसर्ग

 धरण                          विसर्ग
दारणा   –                      4,742 क्यूसेक
गंगापूर  –                      1,160 क्यूसेक
कादवा   –                      530 क्यूसेक
पालखेड  –                     2800 क्यूसेक
होळकर पूल  –               1,631 क्यूसेक
नांदूरमध्यमेश्वर –        9,465क्यूसेक

Editorial Team

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

22 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

41 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

48 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

57 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago