नाशिक

केबलसाठी खोदकाम करताना जलवाहिनी फुटली

सिडको : प्रतिनिधी
स्मार्ट सिटीअंतर्गत सीसीटीव्ही केबल टाकण्याच्या कामादरम्यान पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीला धक्का लागून ती फुटल्याची घटना घडली.
ओम कॉलनीतील झुडिओ मॉलजवळ जेसीबीद्वारे खोदकाम सुरू असताना जलवाहिनी फुटली. यामुळे मोठ्या दाबाने पाणी बाहेर पडून काही वेळातच परिसर जलमय झाला. या घटनेत मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त
केला आहे.
याच ठिकाणी काही दिवसांपूर्वीही जलवाहिनी फुटण्याची घटना घडली होती. त्यानंतरही संबंधित यंत्रणेकडून आवश्यक खबरदारी न घेतल्याने पुन्हा अशीच घटना घडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भूमिगत जलवाहिन्यांची अचूक माहिती घेऊनच खोदकाम केले जाते का, असा प्रश्नही उपस्थित केला
जात आहे.
महापालिकेकडून नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले जात असताना विकासकामांच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे या प्रकारामुळे संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटनेनंतर जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी भूमिगत जलवाहिन्यांचे अचूक नकाशे वापरूनच खोदकाम करण्यात यावे, तसेच संबंधित ठेकेदार व अधिकार्‍यांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ठेकेदाराकडून नुकसानभरपाईची मागणी
संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे जलवाहिनी फुटली असल्यास त्याच्यावर तातडीने दंडात्मक कारवाई करून पिण्याच्या पाण्याच्या नुकसानीची भरपाई वसूल करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच वारंवार घडणार्‍या जलवाहिनी फुटीच्या घटनांची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.

Water pipeline burst during excavation for cables.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago