आमच्याकडे सर्व पुरावे : मुख्यमंत्री
मुुंबई : प्रतिनिधी
सध्या संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून, त्यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. खरात प्रकरण गंभीर असून, या प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला आहे. या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून, आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाविषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘खरात प्रकरणाचा आम्हीच भांडाफोड केला. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी होत आहे. यामध्ये ‘एसआयटी’ तयार केली आहे. नाशिक पोलिस आणि एसआयटी मिळून तपास करत आहेत. या प्रकरणात कोणत्याही परिस्थितीत कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. कुणाकडे काही पुरावा असेल तर त्यांनी समोर यावे. या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये. या प्रकरणाविषयी सगळ्यात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत.
या प्रकरणावर टीका करणार्या विरोधकांना फडणवीसांनी खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, ‘कोण कोण विरोधक तिकडे गेलेले मला माहिती आहे. खरातचे कुणासोबत संबंध याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. कुणाचा कुणासोबतही फोटो असू शकतो. खरातला कुणी भेटले म्हणून त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही. खरातच्या संस्थेला 40 किमीपर्यंत पाण्याची लाइन देण्यासंदर्भातही चौकशी होईल. आपल्या तथाकथित शक्तींचा वापर करून महिलांना फसवणे योग्य नाही. त्याची शिक्षा त्याला भोगावी लागेल. ज्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून 40 किमी दूर पाणी दिले.
तसेच, या प्रकरणात काहींना राजकारण करायचे आहे. पण आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही. ज्या महिलांसोबत त्याने दुर्व्यवहार केला आहे, त्यांना आम्हाला न्याय द्यायचा आहे. लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला पुढे येत नाहीत. या प्रकरणात पीडितांना धीर देऊन त्यांच्या घरच्यांना धीर देऊन पुढे आणले जात आहे. खरातच्या संस्थेला पाणी देण्याच्या निर्णयाची चौकशी करायची आहे पण पहिल्यांदा आम्हाला महिलांना न्याय द्यायचा आहे. खरात प्रकरणी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. खरातला भेटणार्यांपैकी कोणाचा थेट सहभाग असेल तर त्यांच्यावर तर कारवाई होणारच आहे. पण, केवळ भेटले म्हणून कारवाई करायला लागलो, तर मग तुम्हाला माहिती आहे का? कोण-कोण, काय-काय, करायचे? आऊट ऑफ टर्म जात त्यांना पाणी कोणी दिले? चाळीस किलोमीटरची पाईपलाईन कोणी टाकली? त्यामुळे राजकारण करू नये, हा महिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे. तथाकथित शक्तींचा वापर करून महिलांना भरीस पाडणं, यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही. काहीही झालं तरी त्यांना याची शिक्षा भोगावीच लागेल. याकरिता जे-जे करावे लागेल ते करायला सरकार आणि पोलीस तयार आहे, ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
कोणालाही सोडणार नाही
या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुणाजवळ काही पुरावा असेल तर तो त्यांनी आणून द्यावा, त्यावरही कारवाई होईल. पण, राजकीय रंग देऊ नये. विरोधी पक्षाचे कोण कोण नेते गेले, याचे पुरावे मी देऊ शकतो. सर्वांत जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत.
We broke the news of the Kharat case.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…