सरकारवाडा पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल
सिडको : प्रतिनिधी
भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक नवनवीन कारनामे समोर येत असून, पतीसह आलेल्या एका गर्भवती महिलेवरही लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल झाली आहे. विशेष म्हणजे, महिलेच्या पतीला केबिन बाहेर बसवून ठेवत केबिनच्या आतमध्ये भोंदू अशोक खरातने महिलेवर अत्याचार केल्यामुळे खरातच्या कृत्याने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे उघड झाले. भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणार्या अशोक खरात याच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. तक्रारीनुसार, पीडित महिला गर्भवती असताना आरोपीने पूजा विधीच्या नावाखाली तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपी अशोक खरात महिलेसोबत येणार्या पतीला बाहेर बसवून आतमध्ये लैंगिक शोषण करत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच नकली साप आणि वाघाचे कातडे वापरून लोकांना घाबरवून अघोरी कृत्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी अशोक खरात याच्याविरोधात लैंगिक अत्याचारासह महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय भारतीय न्याय संहिता कलम 64(1), 74 आणि 351(2) अंतर्गतही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.कपोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पुजार्यासह कर्मचार्यांचीही पथकाकडून झाडाझडती
बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याच्या प्रकरणाचा तपास आता वेगाने पुढे सरकत असून, विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याच्या निकटवर्तीयांना चौकशीच्या कक्षेत घेतले आहे. मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी, मंदिरातील साफसफाई व देखभाल करणारा कर्मचारी तसेच फार्महाउसचा वॉचमन यांना चौकशीसाठी नाशिक येथे बोलावण्यात आले होते.
Sexual assault on pregnant woman by Kharat
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…