दि. 14 ते 20 डिसेंबर 2025 पुरुषोत्तम नाईक

मेष : भाग्योदय होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. बुध, शुक्र प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना समस्यांना तोंड द्यावे लागेल. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामांना विलंब होईल. भाग्योदय होईल. नवीन घर, वाहन खरेदीचे योग येतील. आरोग्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका.
वृषभ : विवाह जमतील
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. प्रवास त्रासदायक होतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. नोकरदारांवर बालंट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. अविवाहितांचे विवाह जमतील. प्रकृती जपा.
मिथुन : मन अस्वस्थ राहील
या सप्ताहात मंगळ, बुध, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, शुक्र प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांनी व्यवहार सावधपणे करावे. मन अस्वस्थ राहील. मनावर संयम ठेवावा. आरोग्याची काळजी घ्यावी.
कर्क : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात धनचिंता सतावतील. खर्च वाढतील. नोकरदारांना विरोधकांच्या त्रासाला तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांना सुखवार्ता कळतील. धार्मिक कार्यात मन रमेल. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामास विलंब लागेल. प्रकृती जपा.
सिंह : आर्थिक समृद्धी
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनि, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च नियंत्रणात राहतील. मानसिक अस्वस्थता निर्माण होईल. घरात मंगलकार्याचे योग येतील. नोकरदारांना पगारवाढ मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक समृद्धी प्राप्त होईल. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. प्रकृतीची काळजी घ्या.
कन्या : जोरदार आगेकूच
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक दिलासा मिळेल. खर्च वाढतील. नोकरदारांवर कामाचा ताण वाढेल. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. नवीन ओळखी होतील. वाहन जपून चालवा. प्रवास टाळा. प्रकृती सांभाळा.
तूळ : नफा वाढेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनि प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांची हवी तेथे बदली होईल. व्यापारी, व्यावसायिकांच्या नफ्याचे प्रमाण वाढेल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यश मिळेल. प्रकृती चांगली राहील.
वृश्चिक : मन प्रसन्न राहील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. मन प्रसन्न राहील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांच्या नवीन योजना कार्यान्वित होतील. आरोग्य प्रश्नांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
धनु : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात मंगळ, गुरू, राहू, केतू अनुकूल आहेत. बुध, रवी, शुक्र, शनि प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अडचणी सतावतील. कौटुंबिक वाद सामंजस्याने सोडवा.
मकर : लाभ होतील
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. या सप्ताहात प्रवास टाळा. वाहन जपून चालवा. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात अडचणी येतील. शेअरमध्ये लाभ होतील. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : पदोन्नती मिळेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचूक ठरतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अनुकूलता प्राप्त होईल. अविवाहितांचे विवाह जमतील. आरोग्य चांगले राहील.
मीन : समीकरणे जुळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांनी सहकार्‍यांशी वाद तर वरिष्ठांशी संघर्ष टाळा. व्यापारी, व्यावसायिकांची आर्थिक समीकरणे जुळतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात अडथळे येतील. प्रकृती चांगली राहील.

weekly-horoscope-15

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago