नाशिक

कृषिपंपांसाठी रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा

येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी रिपब्लिकनतर्फे वीज कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा

येवला ः प्रतिनिधी
कृषिपंपांसाठी रात्रीचा विद्युत पुरवठा तत्काळ रद्द करून तो दिवसा करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने येवल्यात वीज वितरण कंपनी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. येवला शहरातील विंचूर रोड चौफुली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अ‍ॅड. शिंदे, पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर येथून मोर्चाला प्रारंभ झाला. दरम्यान, सदर मोर्चाला शिवसेना (शिंदे गट), शिवसेना(उबाठा), प्रहार संघटना छावा क्रांतिवीर संघटनांनी पाठिंबा दिला. शेतकरी, शेतमजूर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
मोर्चा शहरातील मुख्य बाजारपेठेतून इंद्रनील कॉर्नर, शनिपटागंण रोडने महावितरण कंपनीकडे आणण्यात आला. तिथे सभेत रूपांतर झाले. अ‍ॅड. शिंदे, स्वारिपचे पगारे, ज्येष्ठ नेते महेंद्र काले, शिवसेनेचे शिंदे गटाचे पांडुरंग शेळके यांची भाषणे झाली. वीज वितरण कंपनीने कृषिपंपांसाठी रात्रीचा वीजपुरवठा तत्काळ रद्द करून दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी केली. वीज वितरण कंपनी कार्यालयाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अ‍ॅड. शिंदे, पगारे, काले यांनी बोलताना दिला. दरम्यान, मोर्चाकर्‍यांतर्फे महावितरण कंपनीचे उपअभियंता आर. एम. पाटील, उपअभियंता मिलिंद जाधव यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात वीज कंपनीकडून भारनियमनाच्या नावाखाली कृषिपंपांसाठी रात्रीचा वीजपुरवठा केला जातो. अनेक शेतकरी बांधवांनी सौरऊर्जा कृषिपंप बसवल्यामुळे वीज वितरण कमी झाले आहे. असे असतानादेखील भारनियमन कसे? असा कार्यकर्त्यांना प्रश्न पडतो. नाइलाजास्तव पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांवर जर बिबट्याने हल्ला केल्यास जबाबदार कोण राहील? शेतकर्‍याचा जीव गेल्यानंतर शासन मदत जाहीर करते, मदत देण्याऐवजी दिवसाची कृषिपंपांसाठी वीज द्यावी, अशी मागणी आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. शिंदे, शाहू शिंदे, स्वारिपचे जिल्हाध्यक्ष पगारे, पांडुरंग शेळके, जिल्हा परिषद माजी सदस्य महेंद्र काले, महेश काळे, युवा नेते गोरख पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शेलार, सुभाष निकम, प्रहारचे हरिभाऊ महाजन, किरण चरमळ, योगेश सोनवणे, अमोल तळेकर, शेतकरी नेते श्रावण देवरे पाटील, छावाचे प्रफुल्ल गायकवाड, शिवसेना युवा नेते डॉ. महेश जोशी, स्वारिपचे तालुकाध्यक्ष विजय घोडेराव, तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब आहिरे, उपाध्यक्ष विनोद त्रिभुवन, मयूर सोनवणे, संतोष आहिरे, बाळू पठारे, अक्षय तांदळे, सचिन कड, रामदास पवार, सुरेश कदम, गणेश झाल्टे, विजय पगारे, समाधान पगारे, बाळासाहेब सोनवणे, समाधान गुंजाळ, दादासाहेब मोरे, सुरेश खळे, वसंत घोडेराव, प्रशांत वाघ, अजीजभाई शेख, अमोल झाल्टे, प्रशांत जाधव, गौतम पगारे, विनायक गायकवाड, दौलत गायकवाड, दिलीप गायकवाड, नलिनी पाटील, राणी शिंदे, ज्योती पगार, सुनंदा काळे, अलका घोडेराव, उषाबाई पगारे, मनीषा पगारे, पुष्पा आहिरे, नीता आहिरे, शोभाबाई घोडेराव, शाबिना शेख, पार्वतीबाई पगारे, रूपा मावस आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Electricity should be provided for agricultural pumps during the day instead of at night.
 
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोंगराळे बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशी

मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…

2 minutes ago

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago