मेष : गुंतवणूक लाभदायी
या सप्ताहात रवी, मंगळ, शुक्र, राहू, केतू, बुध अनुकूल आहेत. गुरू आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक दिलासा मिळेल. शेअरमध्ये लाभ होतील. गुंतवणूक लाभदायी ठरेल. नोकरदारांना कष्टाची कामे करावी लागतील. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. मंगलवार्ता कळतील.
वृषभ : प्रवास टाळा
या सप्ताहात रवी, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. पैसे हातात येतील पण टिकणे कठीण आहे. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणी वाढतील. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. प्रवास टाळा. वाहन जपून चालवा.
मिथुन : अनपेक्षित खर्च वाढेल
या सप्ताहात मंगळ, बुध, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, शुक्र प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. ऐषोरामतात पैसे खर्च होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरदारांना जास्त काम करावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांच्या आर्थिक समस्या सुटतील. आरोग्य सांभाळा.
कर्क : आर्थिक लाभ
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. नोकरदारांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी, व्यावसायिकांच्या योजना यशस्वी होतील. शेअरमध्ये लाभ होतील.
सिंह : पदोन्नती मिळेल
या सप्ताहात रवी, मंगळ, शुक्र, गुरू अनुकूल आहेत. बुध, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. अडकलेले पैसे मिळतील. खर्च वाढतील. शासकीय कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. आरोग्य प्रश्नांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
कन्या : शेअरमध्ये लाभ होतील
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. प्रवास टाळा, वाहने जपून चालवा. नोकरदारांची कामे वाढतील. व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक लाभ होईल. शेअरमध्ये लाभ होतील. आरोग्यांबाबत सतर्क राहा.
तूळ : अडलेली कामे होतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू अनुकूल आहेत. राहू, केतू अनुकूल आहेत. शुक्र, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे यशस्वी होतील. आरोग्यप्रश्न सतावतील.
वृश्चिक : अडचणी वाढतील
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. शासकीय, कोर्ट कचेरीच्या कामात अडचणी निर्माण होतील. नोकरदारांनी वरिष्ठ, सहकारी व कौटुंबिक वादविवाद टाळावेत. व्यापारी, व्यावसायिकांचा भाग्योदय होईल. प्रकृती जपा.
धनु : आर्थिक लाभ होतील
या सप्ताहात मंगळ, गुरू, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, बुध, शुक्र, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च आटोक्यात येतील. घरात मंगलकार्य होतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांची गणिते चुकतील. हितशत्रू बळावतील. आरोग्याबाबत सतर्क राहा.
मकर : वाहन जपून चालवा
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. शासकीय, कोर्ट कचेरीचे प्रश्न लांबणीवर पडतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा.
कुंभ : गणिते जुळतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. वाद टाळा, सामंजस्य दाखविणे गरजेचे आहे. नोकरदारांची प्रगती मंदावेल. व्यापारी, व्यावसायिकांची गणिते जुळतील. आरोग्य जपा.
मीन : खर्च वाढतील
या सप्ताहात बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, मंगळ, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. सावकार, बँका, घेणेकरी तगादा लावतील. खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतील. नोकरदारांना अडचणी त्रस्त करतील. विरोधकांच्या कारवाया वाढतील.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…