साप्ताहिक राशिभविष्य

दि. 22 ते 28 मार्च 2026
पुरुषोत्तम नाईक

मेष : आर्थिक समृध्दी
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शनिची साडेसाती, रवी प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. मन प्रसन्न राहील. वातावरण उत्साही राहील. नोकरदारांना अडचणी जाणवतील. व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक समृध्दी प्राप्त होईल. आरोग्यप्रश्नांची काळजी घ्या.
वृषभ : पैशांची आवक वाढेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शनि अनुकूल आहेत. शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांनी मनावर संयम ठेवून शांत राहणे महत्त्वाचे ठरेल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. आरोग्य चांगले राहील.
मिथुन : व्यवसायवृध्दी
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. पैशांची ओढाताण होईल. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदार वादविवादात अडकतील. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. मानसिक अस्वस्थता राहील. मन अध्यात्माकडे टळेल. आरोग्य जपा.
कर्क : संकटे कोसळतील
या सप्ताहात रवी, शुक्र, शनि अनुकूल आहेत. मंगळ, बुध, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. अपेक्षित पैसे मिळणार नाहीत. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांवर अनपेक्षित संकटे कोसळतील. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे अपेक्षेच्या विपरित होतील. प्रकृतीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. प्रवास टाळा.
सिंह : आर्थिक दिलासा
या सप्ताहात शुक्र, मंगळ, बुध, गुरू अनुकूल आहेत. रवी, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. अनेपक्षितपणे मदतीचा हात मिळेल. आर्थिक दिलासा मिळेल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अनुकूलता प्राप्त होईल. नोकरदारांच्या अडचणी दूर होतील. व्यापारी, व्यावसायिकांची गणिते जुळतील. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : धनचिंता दूर होतील
या सप्ताहात बुध, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात धनचिंता दूर होतील. आर्थिक अडचणींवर मात कराल. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना वादविवादाला तोंड द्यावे लागेल. शासकीय, कोर्ट कचेरीच्या कामात अडचणी येतील. आरोग्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका.
तूळ : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, शुक्र, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. नोकरदारांना अहचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांना सुखवार्ता कळतील. विरोधकांच्या कारवायांकडे नीट लक्ष ठेवा. आरोग्यप्रश्नांची नीट काळजी घ्या.
वृश्चिक : धनचिंता सतावतील
या सप्ताहात बुध, शनि, रवी अनुकूल आहेत. मंगळ, शुक्र, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. धनचिंता सतावतील. नोकरदार व व्यापारी, व्याावसायिकांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. राहत्या घराचे प्रश्न निर्माण होतील. आरोग्याबाबत दक्षता घ्या.
धनु : जोरदार आगेकूच
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणी सतावतील. खर्च नियंत्रणात राहतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. आरोग्याची काळजी घ्या.
मकर : पदोन्नती मिळेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांचे येणे पैसे वसूल होतील. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. आरोग्याबाबत दक्ष रहा.
कुंभ : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. नोकरदारांना सन्मानप्राप्ती होईल. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचूक ठरतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. आरोग्याची काळजी घ्या. शनिची साडेसाती सुरू आहे.
मीन : प्रवास टाळा
या सप्ताहात शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, मंगळ, बुध, राहू, केतू गुरू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणी दूर होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. प्रकृती जपा.

Weekly Horoscope

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *