दि. 14 ते 20 जून 2026
पुरुषोत्तम नाईक
मेष : अडचणी सौम्य होतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणी सौम्य होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे प्रश्न सुटतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामांना विलंब होईल. मनावयर संयम ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या.
वृषभ : धनलाभ होईल
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. नोकरदारांवर वरिष्ठ नाराज होतील. व्यापारी, व्यावसायिकांना धनलाभ होईल. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. बांधकाम व्यावसायिकांना सावध भूमिका आवश्यक. प्रकृती जपा.
मिथुन : खरेदी होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू, शनि अनुकूल आहेत. रवी प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नवीन वाहन किंवा फ्लॅट, बंगला, घराच्या खरेदीची शक्यता नाकारता येत नाही. नोकरदारांनी अकारण चीडचीड टाळावी. व्यापारी, व्यावसायिकांच्या योजना मार्गी लागतील.
कर्क : वाद टाळा
या सप्ताहात मंगळ, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, बुध, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांनी वरिष्ठांशी वाद टाळावे. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. मोठ्या खरेदीवर भर द्याल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह : आगेकूच होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध अनुकूल आहेत. गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. पैशांची ओढाताण होईल. खर्च वाढतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अडचणी निर्माण होतील. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. बांधकाम व्यावसायिकांची आगेकूच होईल. नोकरदारांनी कामातील चुका टाळाव्यात. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचूक ठरतील. आरोग्यप्रश्नांकडे दुर्लक्ष करणे टाळा.
कन्या : कामे मार्गी लागतील
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची कामे मार्गी लागतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. शेअरमध्ये लाभ होतील. आरोग्य सांभाळा.
तूळ : पैसे वसूल होतील
या सप्ताहात मंगळ, रवी, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शनि प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. अडकलेले पैसे वसूल होतील. नोकरांवर जास्त कामाचा ताण पडेल. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. मनावर संयम ठेवा. आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, बुध, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्र्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्तिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांनी सावध भूमिका घेणे आवश्यक आहे. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. आरोग्य सांभाळा.
धनू : मंगलवार्ता कळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, गुरू, शुक्र, शनि प्रतिकुल आहेत. चंद्र्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र आहे. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांची प्रगती होईल. व्यापारी, व्यावायिकांची गणिते जुळतील. मंगलवार्ता कळतील. आरोग्यप्रश्नांची नीट काळजी घ्या.
मकर : विवाह जमतील
या सप्ताहात शुक्र, बुध, गुरू, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणी सतावतील. खर्च नियंत्रणात राहतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यश मिळेल. नोकरदारांना बढती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विसंबू नये. अविवाहितांचे विवाह जमतील. अनुरूप वधूवर मिळतील. आरोग्य जपा.
कुंभ : प्रगती होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध अनुकूल आहेत. ानिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. अपेक्षित पैसे मिळणार नाहीत. नोकरदारांची प्रगती होईल. व्यापारी, व्यावसायिकांची धोरणे अचूक ठरतील. आरोग्य चांगले राहील.
मीन : आर्थिक परिस्थिती संमिश्र
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी, व्यावसायिकांना अपेक्षित मार्ग सापडतील. आरोग्य चांगले राहील.
Weekly Horoscope
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…