नाशिक

मुंबई महामार्गावरील ढाब्यांमधून पनीर गायब?

बोगस पनीरच्या चर्चेने संशय गडद; ग्राहकांमध्ये भीती

इगतपुरी : प्रतिनिधी
नाशिक-मुंबई महामार्गालगतच्या हॉटेल्स आणि ढाब्यांवरून पनीरचे पदार्थ अचानक गायब झाल्याने प्रवाशांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, तर काही हॉटेलचालकांनी पनीरच्या भाज्यांवर थेट 30 ते 40 रुपयांची भाववाढ केल्याने ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त
होत आहे.
तालुक्यातील काही गावांमध्ये बोगस पनीर तयार केले जात असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. कमी दरात निकृष्ट दर्जाचे पनीर पुरवले जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर, अचानक अनेक नामांकित हॉटेल्स आणि ढाब्यांवर “पनीर उपलब्ध नाही” असे बोर्ड पाहायला मिळत आहेत. पनीर बटर मसाला, कढाई पनीर, पनीर टिक्का यांसारखे लोकप्रिय पदार्थ मेन्यू कार्डवरून गायब झाल्याने, “आतापर्यंत आपण नेमके काय खात होतो?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
विशेष म्हणजे, तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणावर पनीरची विक्री होते. मात्र, या पनीरची गुणवत्ता आणि परवान्यांबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. बोगस पनीरच्या अफवांनंतर अचानक निर्माण झालेल्या या तुटवड्यामुळे संशयाचे ढग अधिक गडद झाले आहेत.
या संपूर्ण गंभीर प्रकरणानंतरही अन्न व औषध प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मोठी तपासणी मोहीम किंवा छापेमारी झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिक ग्राहक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून पनीरचे नमुने तपासण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणार्‍या या रॅकेटचा पर्दाफाश कधी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष
लागले आहे.

Has paneer disappeared from dhabas along the Mumbai highway?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago