दि. 5 ते 11 जुलै 2026
पुरुषोत्तम नाईक
मेष : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र आहे. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणीत वाढ होईल. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. शेअरमध्ये लाभ होतील. कौटुंबिक वाद टाळा. मनावर संयम ठेवा. आरोग्य प्रश्नांची वेळीच काळजी घ्या. सावध रहा.
वृषभ: पैसे वसूल होतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना कामाचे ओझे वहावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांचे अडकलेले पैसे वसूल होतील. शेअरमधील गुंतवणुकीबाबत सावध भूमिका घ्या. मनावर संयम ठेवा. आक्रताळेपणा करू नका.
मिथुन : यश मिळेल
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहे. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढेल. या सप्ताहात प्रवास टाळा. वाहन जपून चालवा. नोकरदारांना अडचणी त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिकांची कामे गती घेतील. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे यशस्वी होतील. प्रकृती जपा.
कर्क : अचानक धनलाभ
या सप्ताहात मंगळ, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, बुध, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. धनचिंतांना उतार पडेल. नोकरदारांचे धाडस यशस्वी होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे चुकतील. खर्च वाढतील. अचानक धनलाभाचे योग संभवतात. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह : सांपत्तीक लाभ
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. गुरू, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. पैशांची ओढाताण होईल. खर्च वाढतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामास विलंब होईल. नोकरदारांनी वाद, संर्घे टाळावे, व्यापारी, व्यावसायिकांना मोठे सांपत्तिक लाभ संभवतात. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : अनुकूलता प्राप्त होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शनि अनुकूल आहेत. रवी, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची संमिश्र परिस्थिती राहील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अनुकूलता प्राप्त होईल. अध्यात्मिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्य चांगले राहील. सतर्क रहा.
तूळ : समिकरणे जुळतील
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू अनुकूल आहेत. मंगळ, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणी त्रस्त करतील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांवर कामाचा बोजा पडेल. व्यापारी, व्यावसायिकांची समिकरणे जुळतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. प्रकृती जपा.
वृश्चिक : भाग्योदय होईल
या सप्ताहात मंगळ, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, बुध, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांची प्रगतीकडे वाटचाल होईल. व्यापारी, व्यावसायिकांच्या नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. भाग्योदयकारक घटना घडतील. आरोग्याची काळजी घ्या. कुपथ्य टाळा.
धनु : प्रगती होईल
या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, गुरू, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांची प्रगती होईल. व्यापारी, व्यावसायिकांच्या अडचरी दूर होतील. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास टाळा. वाहन जपून चालवा. प्रकृती जपा.
मकर : मंगलवार्ता कळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शनि अनुकूल आहेत. रवी, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांचे स्त्रोत सुरू होतील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना अडचणी त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिकांना अडचणीतून मार्ग सापडतील. मंगलवार्ता कळतील. आरोग्याची काळजी घ्या. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल.
कुंभ : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शनिची साडेसाती, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. धनचिंता मिटतील. नोकरदारांना वादविवादांना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांना सुखवार्ता कळतील. वाहन जपून चालवा. प्रवास टाळा, आरोग्यप्रश्नांची काळजी घ्या.
मीन : आर्थिक सुबत्ता
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू अनुकूल आहेत. ानिची साडेसाती, रवी, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांना सावध भूमिका घेणे गरजेचे ठरेल. खर्च वाढतील. विरोधकांच्या कारवाया त्रस्त करतील.
Weekly Horoscope
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik