साप्ताहिक राशिभविष्य

दि. 13 ते 19 सप्टेंबर 2026
पुरुषोत्तम नाईक

मेष : व्यवहार सुरळीत होतील

या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. नोकरदारांची चूक अडचणीत आणेल. व्यापारी, व्यावसायिकांची कामे सुरळीत होतील. प्रकृतीची काळजी घ्या.

वृषभ : जोरदार आगेकूच

या सप्ताहात मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, राहू, केतू, शुक्र प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च आटोक्यात राहतील. या सप्ताहात अचानक धनलाभाचा योग संभवतो. नोकरदार अडचणीतून मुक्त होतील. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन : यशप्राप्ती होईल

या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च आटोक्यात राहतील. अडकलेले पैसे वसूल होतील. पैशांची आवक वाढेल. नोकरदारांना यशप्राप्ती होईल. व्यापारी, व्यावसायिकांच्या योजना यशस्वी होतील.

कर्क : समीकरणे जुळतील

या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. मंगळ, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. नोकरदारांनी वरिष्ठांशी वादविवाद टाळावेत. व्यापारी, व्यावसायिकांची समीकरणे जुळतील. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह : आर्थिक दिलासा

या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. रवी, गुरू, शनि, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होईल. व्यापारी, व्यावसायिकांचे पैसे वसूल होतील. आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शेअरमध्ये लाभ होतील. प्रकृती जपा.

कन्या : योजना सफल होतील

या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. नोकरदारांनी संयम पाळणे हिताचे ठरेल. मानसिक अस्वास्थ्य राहील. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. व्या%