साप्ताहिक राशिभविष्य

दि. 18 ते 24 ऑक्टोबर 2026

मेष : अनपेक्षित लाभ

या आठवड्यात चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. त्यामुळे आर्थिक आवक चांगली राहील. चांगल्या कालावधीमध्ये महत्त्वाचे काम करायला हरकत नाही. चांगल्या गोष्टींचा श्रीगणेशा होईल. व्यावसायिकदृष्ट्या रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरदारवर्गाला कामाच्या संदर्भात नियोजित वेळापत्रक करावे लागेल. आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित लाभ होईल.

वृषभ : सावधगिरी बाळगा

या सप्ताहात चंद्रभमणे अनुकूल आहेत. आर्थिक लाभ होतील कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. आपले काम ठरवल्याप्रमाणे आणि वेळेत पूर्ण होईल. काळजी घेऊन काम करावे लागेल. जास्त बोलून काहीही साध्य होत नाही, तेव्हा मोजकेच बोला म्हणजे काही गोष्टी अंगलट येणार नाहीत. व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे नुकसानीचे असेल. आरोग्य सांभाळा.

मिथुन : धाडसी निर्णय घ्याल

या सप्ताहात चंद्रभ्रमणे प्रतिकूल आहेत. आर्थिक दृष्टिकोनातून हा सप्ताह उत्तम आहे. व्यवसायात भरभराट होईल. नोकरदार वर्गाचे कामाकडे लक्ष लागेल. आर्थिक चिंता मिटेल. जे प्रयत्न करीत आहात ते सोडू नका. या प्रयत्नांना आज ना उद्या यश मिळणार आहे. द्विधा अवस्थेतून बाहेर पडा. चांगल्या दिवसांमध्ये धाडसी निर्णय घ्याल.

सिंह : समाधान लाभेल

या सप्ताहात ग्रहमान अनुकूल असून, आर्थिक बाजू भक्कम होईल. आठवड्यातील सर्व दिवस चांगले आहेत. सध्या तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा असेल. अगदी वेळेत काम पूर्ण होईल. व्यावसायिकदृष्ट्या आघाडी मिळवाल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत योग्य ते निर्णय घेता येतील. मित्रपरिवाराकडून शुभेच्छा मिळतील. संततिसौख्य लाभेल. समाधान लाभेल.

कन्या : कामे वेळेत होतील

या सप्ताहात ग्रहमानाची साथ लाभणार असून, चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. कामे व्यवस्थित पार पाडाल. इतरांचे मार्गदर्शन लाखमोलाचे ठरेल. व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदारवर्गाला आपले अधिकार प्राप्त करण्यासाठी वरिष्ठांशी बोलताना योग्य मुद्दे मांडावे लागतील. आरोग्य उत्तम राहील.

तूळ : संधी मिळेल

या सप्ताहात चंद्रग्रहाचे भ्रमण लाभदायक राहील. बर्‍याच दिवसांपासून ज्या संधीची तुम्ही वाट पाहत आहात ती आता मिळणार आहे. काम पूर्ण झाल्याचा आनंद तुमच्या चेहर्‍यावर असेल. व्यवसायातील उत्पन्न चांगले असेल. नोकरदार वर्गाचे काम सुरळीत चालू राहील. आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित लाभ होईल. घरगुती वातावरण चांगले राहील.

वृश्चिक : वरिष्ठांशी वाद नको

या सप्ताहात चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. आर्थिक स्थिती चांगली राहील. वादविवाद होण्यापेक्षा न बोललेले चांगले हे लक्षात ठेवा. त्यामुळे शांत राहून काम करा. तडजोड स्वीकारा. म्हणजे नुकसान होणार नाही. काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होऊ शकतात. व्यवसायात खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नका. नोकरदार वर्गाने वरिष्ठांचे मत विचारात घ्यावे.

धनु : समाजसेवा कराल

या सप्ताहात चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. अति बोलण्यामुळे गैरसमज निर्माण होतील. स्वत:चे काम स्वत:च करा. मनामध्ये नकारात्मक भूमिका घेऊ नका. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा. समाजसेवा कराल. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. भटकंती टाळा. आरोग्याची काळजी घ्या.

मकर : वायफळ खर्च टाळा

या सप्ताहात चंद्रभ्रमणे चांगली आहेत. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. धीर धरा. काम करत असताना कोणावर अवलंबून राहू नका. स्वत:चे काम स्वत:च करा. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये कामाला गती येईल. नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष द्यावे. वायफळ खर्च टाळा. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य मिळेल. घरगुती वातावरण चांगले राहील. प्रकृती जपा.

कुंभ : मानसिक समाधान लाभेल

या सप्ताहात चंद्राचे भ्रमण अतिशय लाभदायक राहील. संघर्षदायक वातावरण कमी होईल. सध्या तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असणार आहे. कामामध्ये गुंतून राहाल. व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे वेळ देता येईल. आर्थिक बाबतीत समाधानाची बाब राहील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. मानसिक समाधान लाभेल.

मीन : कामे जलद होतील

या सप्ताहात चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत.आर्थिकदृष्ट्या आवक वाढेल. बेकायदेशीर गोष्टींपासून लांब राहा. नियम पाळा. कामाला गती येईल. व्यवसायात चांगला नफा राहील. नोकरदार वर्गाला कामात यश मिळेल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा होईल. मित्र-परिवाराकडून शुभेच्छा मिळतील. नातेवाईकांशी संवाद साधाल. भावंडांशी मदत कराल. पथ्यपाणी सांभाळा.

Weekly Horoscope

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *