पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.
रोज दही खाल्ल्यास चरबी कमी होण्यास मदत होते.दही खा व दिवसातून दोन-तीन वेळेस कमीत कमी एक लिटर ताक प्यावे. पिंपळाच्या सालीचे चूर्ण, धने, जिरे, सैधव, दररोज दीड चमचा ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.
वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दूध, टोन्ड दही, टोन्ड पनीर
मलई नसलेले रोज खा.
आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.
दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी 4 किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री 8.30 नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्या.
जेवणात वरून मीठ घेऊ नये. परंपरागत मसाले अन्नाची केवळ चव वाढवत नाही तर यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट, अँटीऑक्सिडेंट आणि फायबरही असते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की, हे मसाले भाजण्यासाठी तेलाचा जास्त उपयोग करू नये.
वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्त प्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ (डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या.
सर्वांत जास्त फोकस ब्रेकफास्टवर करा. लोक वजन कमी करण्याचा नादात ब्रेकफास्ट करत नाहीत परंतु एका रिसर्चनुसार नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. ब्रेकफास्टमध्ये नेहमी एकसारखे पदार्थ सेवन करू नयेत.

Team Gavkari

Recent Posts

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

3 minutes ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

15 minutes ago

नॉन क्रिमीलेअर मर्यादा पंधरा लाख

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…

52 minutes ago

मोटेगावकरच्या मुलासह विद्यार्थी, पालक रडारवर

नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…

1 hour ago

काटकसर-पर्व

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…

23 hours ago

माय मराठीसह बोलीभाषांचा जागर; आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा

माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…

23 hours ago