नाशिक

सिंहस्थ आरक्षणाचे काय झाले; शेतकर्‍यांचा प्रश्न

अवैध अन् अनधिकृत बांधकामांनी निर्विघ्न कुंभमेळा होणे अवघड

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा भरवण्यासाठी शेतजमिनी अधिग्रहीत करण्यासाठी शासन आग्रही आहे, तर सिंहस्थ आरक्षणाचे काय झाले, असे शेतकरी विचारत आहेत. डीपी तयार करताना तो बिल्डरधार्जिणा झाला म्हणून आज शेतजमिनी जाण्याची वेळ आली आहे. याबाबत बाधित शेतकर्‍यांची खात्री झाली आहे.
त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यासाठी जागेची उपलब्धता हवी. शहर विकास योजना तयार करताना टाउन प्लॅनिंग आणि स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नगरपरिषदेने विचार करण्याची आवश्यकता होती. किंबहुना 2013 मध्ये मुदत संपलेला शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी हद्दवाढ करून 2017 साल उजाडावे लागले. त्यातही तत्कालीन मुख्याधिकार्‍यांनी तत्कालीन नगराध्यक्षांच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली.
त्यानंतर नगराध्यक्षांना राजीनामा देणे भाग पडले. तेव्हाचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी त्र्यंबकेश्वरच्या डीपीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले व तातडीने हा आराखडा रद्द करण्याचे आदेश दिले. तथापि, तसे घडले नाही.
डीपीमध्ये तीव्र उताराचे डोंगर रहिवासी क्षेत्र म्हणून पिवळ्या पट्ट्यात घेतले, तर सखल जमिनींना हिरव्या पट्ट्यात आणि आरक्षणात टाकले. शासकीय भूखंड बाजूला ठेवून खासगी जमिनी आरक्षणात टाकण्यात आल्या. भौगोलिक रचना पाहता शहराचा विस्तार पूर्व आणि उत्तर दिशेने होईल, अशी आहे. मात्र, दक्षिण बाजूला ब्रह्मगिरीलगत असलेली शेकडो एकर जमीन व डोंगर पिवळ्या पट्ट्यात घेतले. संबंधित यंत्रणांनी दिलेली मूकसंमती संशयास्पद आहे. शहराच्या बाहेर वाढीव हद्दीत अवास्तव रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचा नेमका हेतू काय? याबाबत मौन बाळगले.
सन 2017 मध्ये प्रस्तावित आराखड्यावर हरकती घेतल्या त्यांना केराची टोपली दाखवली.त्यानंतर 2019 मध्ये आलेली वाढीव योजना कधी मंजूर झाली याबाबत आजतागायत गुप्तता राखली गेली.

2019 मध्ये डीपीमध्ये असलेली तरतूद

सिंहस्थ झोन 50.59 हेक्टर, शाही मार्ग पुनर्वसन 1.45 हेक्टर अशी एकूण 51.99 हेक्टर म्हणजेच 0.5199 चौरस किमी इतके आहे. शहराची हद्द 11 चौरस किलोमीटर असताना त्यात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केवळ अर्धा चौरस किमी क्षेत्र आरक्षित ठेवण्यात आले. यावरून सिंहस्थ कुंभमेळा भरविण्यासाठी शासनाचा नगरविकास विभाग आणि नगरपरिषद किती गंभीर होते, हे दिसते. प्रस्तावित आणि वाढीव योजनेत असलेल्या आरक्षणांबाबत ठराव घेण्याची व आरक्षण बदलण्याची घाई केली. यामधून सिंहस्थ आरक्षण वगळण्यासाठी ठराव झाले. सिंहस्थ कुंभमेळ्याचे शहर असलेल्या आणि पूर्वीच्या 1.89 चौरस किमी क्षेत्रात वाढ होऊन 11 चौरस किमी हद्द प्राप्त झालेल्या त्र्यंबकनगरीच्या डीपीत सिंहस्थ कुंभमेळ्याला नगण्य स्थान मिळाले आहे.

What happened to Simhastha reservation; Farmers’ question

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago