मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत सध्या प्रतिदिन वर्तमानपत्रांत बातम्या वाचायला मिळत आहेत. जगातील सर्वांत प्रदूषित शहरांच्या सूचीत मुंबईने यंदा तिसरा क्रमांक पटकावला आहे. वाढते तापमान, मंदावलेले वारे आणि आर्द्रतेमुळे प्रदूषणात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. तसेच ‘अल निनो’च्या प्रभावामुळे प्रदूषण वाढण्याची तज्ज्ञांची शक्यता आहे. शहरात धूर आणि धुक्याचे प्रमाण वाढल्याने दृश्यमानतेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दिवाळी अद्याप सुरूही झाली नसताना मुंबईतील प्रदूषणाची ही स्थिती आहे. मुंबईतील चौकाचौकांत सुरू असलेली विकासकामे, इमारतीची बांधकामे यामुळे प्रदूषण वाढते आहे. यावर तात्पुरती उपाययोजना म्हणून संपूर्ण मुंबई महापालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस सर्व बांधकामे आणि पाडकामे बंद ठेवावीत, अशी सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्राद्वारे केली आहे. मुंबईतील वाढत्या वाहनसंख्येमुळेही वायू आणि ध्वनिप्रदूषणातही भर पडू लागली आहे. मुबई-पुणे यांसह राज्यातील प्रगतिशील शहरांतील वाढती वाहनसंख्या नागरिकांसह प्रशासनाचीही डोकेदुखी ठरू लागली आहे. यंदा दसर्याच्या मुहूर्तावर नवीन गाडी घरी आणण्यासाठी राज्यभरात एक लाख 12 हजार 814 गाड्यांची नोंदणी करण्यात आली. यांपैकी पुण्यात सर्वाधिक 12 हजार 752 वाहनांची नोंदणी करण्यात आली, तर त्यामागोमाग मुंबईत आठ हजार 991 नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली. पालघर जिल्ह्यातील वसई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तब्बल 4,759 नवीन वाहनांची नोंदणी झाली, प्रादेशिक परिवहन कार्यालयात दसर्याच्या शुभमुहूर्तावर 893 वाहनांची नोंदणी करण्यात आली. 15 वषार्ंहून जुने व्यावसायिक वाहन आणि 20 वर्षांहून अधिक जुने खासगी वाहन असेल तर त्याचे फिटनेस प्रमाणपत्र काढून गाड्या वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्या प्रमाणात रस्त्यावरील वाहने वाढत आहेत त्या तुलनेत ती स्क्रॅप केली जात नाहीत. त्यामुळे वाहनांचा समतोल राखला जात नाही. शहरांसारख्या ठिकाणी रस्त्यांची मर्यादित लांबी, रुंदी, पार्किंगसाठी उपलब्ध जागा आणि सध्या चालू असणारी विकासकामे पाहता वाढती वाहनसंख्या भविष्यात शहरांतील जीवनमानावर गंभीर परिणाम करू शकते.
आपल्याही दारात आपली स्वतःची गाडी असावी असे प्रत्येक व्यावहारिक माणसाचे स्वप्न असते. दरवर्षी गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळी या सणांना मोठ्या प्रमाणात वाहने खरेदी केली जातात. शहरांत पूर्वी सर्वच गाड्या पेट्रोल-डिझेलवर चालणार्या असत. त्यानंतर सीएनजीचा पर्याय आला. इंधन खर्च वाचावा म्हणून लोकांनी आपल्या जुन्या गाड्या विकून सीएनजीवर चालणार्या गाड्या खरेदी केल्या. आता विजेवर म्हणजेच बॅटरीवर चालणार्या गाड्या बाजारात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे लोकांकडून या गाड्यांना अधिक पसंती मिळू लागली आहे. टॅक्सी, रिक्षा यांच्याप्रमाणे खासगी वाहनांच्या खरेदी-विक्रीवर कोणतेच बंधन नसल्याने शहरातील वाढती वाहनसंख्या रोखायची कशी, हा मोठा प्रश्न आहे. लोकसंख्येच्या भस्मासुराने मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांना आधीच गिळंकृत केले आहे. याचा भार लोकलगाड्या, बसगाड्या, टॅक्सी आणि रिक्षा यांवर पडत आहे. यावर पर्याय म्हणून सुरू केलेली मोनो आणि मेट्रो रेल्वेही कमी पडू लागली आहे. आजमितीला शहरातील लोकांचे राहणीमान उंचावल्याने आणि लोकल अन् बसगाड्यांतील जीवघेणी गर्दी नकोशी वाटू लागल्याने सर्वसामान्य नोकरदारही स्वत:च्या मालकीचे वाहन घेऊ लागला आहे.
व्यवसायासाठी घेतल्या जाणार्या रिक्षा-टॅक्सींसह ‘ओला’, ‘उबेर’ ’रॅपिडो’ यांसारख्या वाहतूक आस्थापनांच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी विकत घेण्यात येणार्या वाहनांचीही दरवर्षी यात भर पडत आहे. वाढत जाणार्या वाहनांच्या तुलनेत मुंबई-ठाण्यातील रस्त्यांची संख्या आणि आकारमान मर्यादित आहे. मुंबईतील इंच इंच जागेला सोन्याचा दर असल्याने गाड्या उभ्या करण्यासाठी मोकळ्या जागाही कमी पडत आहेत. रस्त्यांवर उभ्या केल्या जाणार्या गाड्या वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. दरवर्षी मुंबईतील वाहनांच्या संख्येत दोन ते तीन लाख वाहनांची भर पडते. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढले असले तरी मुंबईकरांच्या हौसेपुढे ते नगण्य आहेत असेच म्हणावे लागेल. मुंबईत वाढत जाणारी वाहनसंख्या वायू आणि ध्वनिप्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर घालत आहे.
परिणामी नागरिकांना विशेषत: लहान मुलांना आणि वयस्कांना श्वसनाचे आणि फुप्फुसांचे विकार जडत आहेत. शहरांत चालू असलेले मेट्रो-मोनो रेल्वे प्रकल्प, तसेच विविध कामांसाठी रस्त्यांत नियमितपणे होणारे खोदकाम या सर्वांचा परिणाम वाहतुकीच्या गतीवर होत असतो. त्यामुळे शहरातील सिग्नल यंत्रणेवर वर्दळीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात ताण येतो. यावर पर्याय म्हणून सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत अवजड वाहनांना मुंबईत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र, त्याचाही विशेष लाभ होताना दिसत नाही. मुंबईप्रमाणे नवी मुंबई, ठाणे, पुणे या प्रगतिशील शहरांतही काहीशी अशीच परिस्थिती आहे. वाहनसंख्येची समस्या लवकरच रौद्ररूप धारण करू शकते.
यासाठी राज्य प्रशासनाने चिंतन करून वाहनसंख्येवर नियंत्रण आणण्याचे आणि या भीषण समस्येविषयी लोकजागृती करण्याचे उपाय शोधले पाहिजेत.
Deadly Pollution and the Growing Number of Vehicles
- वाहिद बागवान ब्रह्मगिरीच्या कुशीतून पाझरणारी गोदावरी, द्राक्षबागांतून आणि सह्याद्रीच्या दर्याखोर्यांतून वाहणारा मंद, शीतल वारा…
- डॉ. किशोर पवार आपल्या भूतलावर 70% भूप्रदेश सागर, महासागर यांनी व्यापलेला आहे. महासागर म्हणजे…
काश्मीरचे दोन भाग आहेत. एक पाकिस्तानात, तर दुसरा भारतात आहे. पाकिस्तानातील काश्मिरी समाधानी नाहीत. त्यांना…
शिवाजीनगरमधील घटना; दोन संशयित ताब्यात पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी शिवाजीनगर परिसरात बंद घराचे कुलूप व…
भाविकांत संताप; दानपेटीतील रोकड अन् सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास येवला : प्रतिनिधी शहरातील पारेगाव रोड परिसरातील…
इगतपुरीत 4,300 शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा घोटी : प्रतिनिधी एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी आणि…