अंतरीचा आवाज भाग ५

 

“तो जेव्हा ती होते”

 

 

मी पदवीधर झालो होतो..काही नोकरी करावी तर मला अशक्य वाटत होतं…मला नाटकातच काम करावे वाटत होते मग मी तेच माझे ध्येय ठरवले…

 

घरात लहान आणि लाडोबा असल्याने असेही  कधी काही  काम करत नव्हतो..काम करायला भाभी,बहीणी,व बाहेरच्या दोन मुलीही होत्या घरकामाला…मग आईसोबत डान्स शिकायला जाणे नित्याचच झाले होते.

 

एक दिवस आईला भरतनाट्यम गृप डान्ससाठी एक लेडीज कमी पडत होती.. संस्थेच्या कार्यक्रमात ती नेहमीच अग्रेसर रहायची…

 

वेळेवर तीशीतली दुसरी बाई कुठे शोधावी व सापडली तरी तीची प्रॕक्टिस कशी करुन घेवु.. म्हणून आईला चिंतेत बघुन आक्का म्हणाली..

 

 

अगं आई ,”आपला दिपक आहे ना..तो तर डांन्समास्टर झालाय आता..आणि शंकुतला किती छान रंगवली त्याने.. मग करेल कि हा रोल तोच छान..”बघ विचार करुन..

 

आईला आनंद झाला..हो गं खरय… पण वयस्कर महीला आहेत सगळ्या दिपक खूप लहान दिसेल ना…! थांब मेकअप वालीला विचारते जमेन का तीशीतली वयस्कर दाखवणं…

 

दुसऱ्या दिवशीच कार्यक्रम होता.. आई मला कार्यक्रम स्थळी सोबतच घेवुन गेली …मेकअप रुममधे गेलो..आणि सरळ मेकअपवाली आंटीला आई म्हणाली..

 

हे बघ बाई, हा दिपक..”तुला तीशीतल्या बाईसारखा तयार करायचाय तेही आताच…वेळ कमीय आपल्याकडे”…जमेल ना तुला..!

 

हो हो ताई..जमेल कि याचा चेहरा तर किती सुंदर आहे काही अडचन नाही ..नका टेन्शन घेवु मी करते तयार दिपकला…

 

आईने सुटकेचा श्वास घेतला आणि इतर लेडीजला पटपट तयार व्हायला सांगितले..

 

आता मला लेडीजचे कपडे घालायला दिले…मला बैचेन झाले ..अख्खा रुममधे पंधरावीस बायका तयार होत होत्या..मी एकटा पुरुष होतो..पण कुणाला काही आडपडदा वाटेना…मला कुणी वेगळं समजतच नव्हतं..कसेतरी पडद्याआड जावुन मी कपडे बदलले तेव्हा ब्लाऊज परकरमधे माझ्यातली मुलीची भावना सुखावत होती..

 

मग दोन मुलींच्या मदतीने माझ्या हातपायाला पहील्यांदा व्हॕक्सिंग करण्यात आले…मी मात्र ओरडत वेदनेचाही आनंद घेत होतो…बिचाऱ्या मुली मनोमन काय म्हणत असतील मला असेही वाटत होते..कि मुलगी बनणं सोपं असतं का ?

 

मग आंबाडा गजरे,साडी, काजळ ,टिकली, बांगड्या, पैजन घुंगरु सगळाच साज चढवण्यात आला..वयस्कर दाखवलेला मेकअपमुळे वीस वर्षाचा दिपक तीसचा दिसु लागली…

 

गृपच्या लेडीजमधे दिपकचा दिपिका होत मॕच झाली…आईने मला तेव्हा पहील्यांदा मुलीच्या रुपात बघुन आनंदाने पाठीवर हात ठेवत कुशित घेतले..माझ्यात एवढी सुंदर मुलगी बघुन सुखावली होती म्हणे…

 

तीन तास त्या रुममधे सगळ्या मला बघुन न संकोचता आपआपलं आवरत होत्या …मला मात्र कसेतरी वाटत होते..कळत नव्हते मी पुरुष म्हणून यांच्याकडे कसे बघावे नजर चोरत होतो..पण त्या सगळ्या जणी सहज माझी मजा घेत होत्या….त्यात आई देखील होती..माझ्यात मीही स्रीलाच बघत होतो..पण विचारात देह पुरुषाचा गोंधळ घालत होता..

 

त्या साडीत मेकअप मधे मी गुंग झालो होतो…कि जणू हेच माझं ध्येय आहे ..!

 

मग स्टेजवर पडदा पडला आणि  प्रेक्षकांसमोर छान सादरीकरण करुन गृपडाॕन्स उत्तम पार पडला…आईला आनंद झाला होता..

 

आता थकायला झाले होते..रात्रीचे आठ वाजले भुक खूप लागली होती..सगळ्या म्हणाल्या आधी जेवण करु मग कपडे बदलु..मी होकार दिला कारण मला त्या पोषाखातुन बाहेर पडून वाटेना…पहील्यांदा दिवसभर बायकामधे बाईसारखं वावरताना मला खूप आवडत होतं..!

 

मग जेवायला जाताना एक आंटी मला चिडवत म्हणाल्या ..दिपक तुझ्याकडे तर पुरुषांच्या नजरा खिळल्याय रे..एवढी सुंदर स्री बघुन…मी लाजलो नकळत मलाही ते जाणवत होते…आणि आवडतही होते..जेवण आटोपले मी सहज भोवताली नजर टाकली तर नजरा खिळलेल्या होत्याच माझ्यावर..

 

मग शेजारी बसलेली आंटी पुन्हा रागवली..

 

भानावर ये दिपक,

 

” तु मुलगा आहेस विसरु नकोस”..मला नकोसे झाले ते वाक्य पण वास्तव होते..

 

अखेर सर्वजणी चेंजरुममधे आलो आता मला बाहेर थांबवण्यात आले..सगळ्यानी चेंज केल्यावर मला शेवटी चेंज करायला पाठवले..

 

मी विचारात पडलो..सगळ्या सकाळपासुन माझ्याशी चेष्ठामस्करी,हसणं बोलणं स्पर्श करत होत्या….तेव्हा मी स्रीवेशात होतो म्हणून ..आणि आता लगेच बघण्याची दृष्टी बदलली माझ्यात पुरुष दिसु लागला होता..

 

जरा मनाला वाईट वाटले ही क्षणात बदलती मानसिकता बघुन …पण तो दिवस माझ्या आयुष्यात खूपच रोमांचित आणि छान होता..मला माझी दिशा सापडली होती…मला काय हवे ते कळाले होते…

 

घरी येवुन आईने माझी दृष्ट काढली आणि दिवसभरचा दिपिकाचा रोल आक्कासह सर्वाना अभिमानाने सांगितला होता…मी मात्र त्या रोलमधुन अजुनही बाहेर येत नव्हतो..एका नव्या जगात उतरलो होतो…!

 

क्रमशः पुढच्या भागात

 

– सविता दरेकर

 

 

 

 

Ashvini Pande

Recent Posts

जिल्हा परिषद गट-गण रचनेचे प्रारूप सादर

चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…

2 hours ago

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार झाले ‘पोषणदूत’

कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…

2 hours ago

प्रस्तावित रामवाडीतील पुलाला साइड ट्रॅक; निविदेतून वगळले

उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…

2 hours ago

लाखलगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…

2 hours ago

लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही

लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…

2 hours ago

अखेरच्या सोमवारी शिवभक्तांची गर्दी

नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…

3 hours ago