घनघोर युद्धानंतर अमेरिका व इराणमध्ये युद्धबंदी झाली. पण दोघांना पटणारा सन्माननीय तोडगा निघाला नाही. इराणवर दबाव टाकण्यासाठी अमेरिका शक्तिप्रदर्शन करत आहे. पण इराण आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अमेरिकेने चीनच्या सहाय्याने इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. 13 मे रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनला गेले. तिथे शांतता वार्ता व युद्धबंदीऐवजी व्यापारावर जास्त भर देण्यात आला. अॅलन मस्क हा स्टारलिंकचा मालक तिथे उपस्थित होता. त्याचवेळी दिल्ली येथे ब्रिस्क देशांची बैठक होती. या दोन्ही वार्ता युद्ध थांबवण्यात असफल ठरल्या.चीनने ट्रम्प तात्यांना ताकीद दिली की, अमेरिकेने तैवानबाबत तटस्थ राहावे. तैवानला हत्यार पुरवू नये. शी जिनपिंग यांनी अमेरिकेविरुद्ध कठोर व निश्चित भूमिका घेतली.
इराणला एअर डिफेन्स सिस्टिम पुरवून अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना तोंड देण्यास चीन मदत करत आहे. इराणने 40 वर्षांपासून युद्धाची योजनाबद्ध तयारी चालवली आहे. फोर्डो नतांश व इस्यापहा इस्पहान याठिकाणी पर्वताच्या खाली इराणने मिसाइल्स व ड्रोनचा साठा करून ठेवला आहे. अमेरिकेने आपली लढाऊ विमानवाहू जहाजे इराणपासून हजारो किलोमीटर दूर ठेवली आहेत. अमेरिकेचा शस्त्रसाठा घटत आहे. इराणविरुद्ध युद्ध थांबवावे असा दबाव अरब देशांकडून येत आहे. दि. 6 जून रोजी इराणने कुवेतच्या विमानतळावर हल्ला केला. अमेरिकेत ट्रम्पतात्याविरुद्ध असंतोष वाढतो आहे. ट्रम्पच्या युद्धखोरीवर आळा घालण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प रोज नवे विधान करीत आहेत. सतत बदलत्या विधानांनी त्यांच्या मनात काय शिजते, याचा थांगपता लागत नाही. महागाई व पेट्रोलचे वाढते दर याने अमेरिकन नागरिक संतापले आहेत. इराणने 360 किलो संवर्धित युरेनियम अमेरिकेच्या हवाली करावे. वीस वर्षे कोणताही अणु विकासाचा प्रयोग करू नये. हार्मुझ सामुद्रधुनी सर्व जहाजांना खुली करावी. त्यातून ये-जा करणार्या जहाजांवर टोल बसवू नये, या मागण्या अमेरिकेच्या आहेत. पण समृद्ध युरेनियम कोणाच्याही ताब्यात देणार नाही, या भूमिकेवर इराण ठाम आहे. इराणने हार्मुझमध्ये पेरलेले पाणसुरुंग काढून टाकावेत व जहाजांचा मार्ग सुरळीत व सुरक्षित करावा यासाठी अमेरिका इंग्लंड, जर्मन व फ्रान्सचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण हार्मुझचा मार्ग बंद केल्याने येथून जगाची 30 टक्के वाहतूक ठप्प पडल्याने हजारो व्यापारी जहाजे उभी आहेत. गॅस व पेट्रोलची अभूतपूर्व टंचाई झाली आहे. हॉटेल व्यवसाय बंद पडत आहेत. देशात महागाई भडकली आहे. युद्धाच्या झळा पसरल्या आहेत. या झळा कधी ज्वाला होतील व ड्रोन, विमाने भारताच्या आकाशात पंख पसरतील याचा नेम नाही. तैवानवर चीन हल्ला करणार आहे. उत्तर कोरियाचा तानाशाही व लहरी शासक किंग जोन शी मिसाइल्स व अणुचाचण्या घेऊन संहार शवित वाढवत आहे. अमेरिकेने उत्तर कोरियाचा धसका घेतला आहे. रशिया व इराणच्या पाठीशी तो सक्रिय उभा आहे. नाटो देश युक्रेनला मदत करण्यात व्यस्त आहेत. रशिया कधीही नाटो देशांवर आक्रमण करू शकतो. युक्रेनने युद्धात अकस्मात आघाडी घेतली आहे. रशियाचे बलस्थान असलेले तेल भांडार व रिफायनरी प्लांट उडवण्यात तो यशस्वी झाला आहे. रशियाच्या हॉस्पिटलवर ड्रोन पडल्याने पुतिन चिडले आहेत. जेरोशेनिक मिसाइल सोडून त्याने कीव बरबाद केले आहे. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगार्याखाली लोक फसले आहेत. विनाशाचे तांडव व शहरांचे स्मशान झाले आहे. राखेच्या ढिगार्यावर बसून झेलेस्की रशियाने बळकावलेला भूभाग परत मिळविल्याशिवाय युद्धबंदी शक्य नाही, हा आत्मघाती हट्ट सोडायला तयार नाही. रशियाचे तीन लाख सैन्य ठार झाले. मास्को आता सुरक्षित नाही. क्रेमलिनवर ड्रोनचा मारा होईल. संयम सुटलेला रशिया कधीही अणुबॉम्बचा प्रयोग करील. जग कधीही भस्मसात होईल, याचा नेम नाही. अमेरिका लढाईतून बाहेर पडू पाहते, पण इस्राईल माघार घ्यायला तयार नाही. लेबनॉनवर हल्ले सुरू आहेत. गाझा पट्टी संपूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. ग्रेटर इस्राइल हे स्वप्न आहे. नेतान्याहू यांना राक्षसी महत्त्वाकांक्षेने पछाडले आहे. अमेरिकेने पाळलेला इस्राईल त्यांच्या ताब्यात राहिला नाही.
रशिया, चीन, इराण, उत्तर कोरिया व बेलारूस अशी एक आघाडी बनली आहे. अमेरिका इंग्लंड, जर्मन, फ्रान्स व नाटो देश अशी दुसरी आघाडी बनू शकते. चीनचा भरोसा नाही. अमेरिकेची हमी नाही. बांगलादेश व पाकिस्तान पुन्हा एक आले आहेत. बांगलादेशमधील घुसखोरांची हकालपट्टी व कुर्ला येथील गरीबनगर उठवल्याने बांगलादेश संतापला आहे. चीन दोघांना भारताविरुद्ध भडकावू शकतो. लढाऊ विमाने व हवाई सुरक्षा प्रणाली पाकिस्तानला फुकट मिळते. भारताने विमानांच्या ऑर्डर दिल्या, पण ते लगेच येणार नाहीत. दहा वर्षे वाट पाहावी लागेल. 42 स्क्वॉॅडनची भारताला गरज आहे. पण भारताचे मिग-29, मिराज-2000 कालबाह्य झाले. विमान दलाचे एअर चीफ मार्शल म्हणतात, विमानेच नाही तर लढणार तरी कसे? पाचव्या पिढीची विमाने भारताजवळ नाहीत. सहाव्या जनरेशनची विमाने चीन बनवत आहे. पाकिस्तान व भारताची हवाई क्षमता बरोबर झाली आहे. मेजर जनरल जी. डी. बक्षी संतापाने म्हणतात, ”तुमच्याकडे स्मारक बनवायला, जुन्या मंदिरांना उभारण्याला पैसा आहे. कॉरिडॉर बनवायला व मतांसाठी फुकट पैसे उधळायला पैसा आहे. पण देशाच्या सुरक्षेसाठी पैसा पुरवायला व लष्करी गरजांवर लक्ष द्यायला वेळ नाही. निवडणुका जिंकणे व सत्ता प्राप्त करणे एवढंंच काम नेत्यांना उरलं आहे.” जगभर युद्धाची आग पेटली असताना व लढाई सीमेवर आली तरी नेते निवडणुकांत व्यस्त आहेत. सत्तेत मस्त आहेत.
When will a solution be found to the US-Iran conflict?
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik