नाशिक

महापालिकेचे सत्ताधीश कोण? 122 जागांचा आज फैसला

सिडकोत दोन वेळा बदलले ‘ईव्हीएम’

नाशिक : प्रतिनिधी
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता काल सकाळी 7.30 वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. पहिल्या सहा तासांची मतदानाची टक्केवारी सुमारे 27 टक्के इतकी होती; मात्र सिडको परिसरात काही ठिकाणी मतदानादरम्यान मशीनमध्ये बिघाड झाल्याने मोठा गोंधळ उडाला.तसेच या गैरप्रकारामुळे मतदारांमध्ये नाराजी
व्यक्त झाली.
प्रभाग क्रमांक 26 मधील खुटवडनगरमधील एका बूथवर उमेदवाराशेजारील बटन दाबले जात नसल्याने मतदान केंद्रात काही काळ गोंधळ उडाला होता. ही माहिती समोर आली. मशीन बदलूनही तोच प्रकार घडल्याने या ठिकाणी नवीन मशीन लावून प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याबाबत उपलब्ध माहिती अशी की, नवीन नाशिक परिसरातील खुटवडनगर येथे दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ असलेल्या प्रभाग क्रमांक 26 च्या एका केंद्रात भाजप पुरस्कृत असलेल्या मोहिनी अशोक पवार यांच्या नावासमोरील बटन दाबले जात नसल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित अधिकार्‍यांनी तातडीने दुसरे मतदान यंत्र बसविले. मात्र, पुन्हा तोच प्रकार घडल्याने याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना देण्यात आल्यानंतर नवीन मशीन बसविण्यात आले.
दरम्यान, नाशिकच्या प्रभाग क्रमांक 29 मधील एका मतदान केंद्रात खोली क्रमांक दोनमध्ये असलेले ईव्हीएम मशीन अचानक बंद पडले. तब्बल अर्धा तास मशीन सुरू न झाल्याने मतदान प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होती. सकाळी लवकर मतदानासाठी आलेल्या मतदारांना मतदान केंद्रावरच ताटकळत थांबावे लागले. यामुळे काही काळ नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर निवडणूक अधिकार्‍यांनी तांत्रिक बिघाड दूर केला आणि मशीन पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर मतदारांनी मतदानास सुरुवात झाली. तसेच सिडकोमधील प्रभाग क्रमांक 24 मधील मॉडर्न हायस्कूल, खोली क्रमांक 8 येथेही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. या मतदान केंद्रावर सकाळी बराच वेळ मतदान सुरू होऊ शकले नाही. ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे मतदान प्रक्रियेला विलंब लागला. तांत्रिक बिघाड तातडीने दूर करून संबंधित मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

येथे होणार प्रभागनिहाय मतमोजणी
प्रभाग –                   मतमोजणीचे ठिकाण
1 ते 3 –                मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडासंकुल, पंचवटी
4 ते 6 –               मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडासंकुल, पंचवटी
7, 12, 24-          दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका
13, 14, 15-         वंदे मातरम् सभागृह, डीजीपीनगर
16, 23, 30 –      दिव्यांग भवन, मुंबई नाका
17, 18, 19-        शासकीय तंत्रनिकेतन, सामनगाव रोड
20, 21 व 22-     नाशिकरोड विभागीय कार्यालय, दुर्गा गार्डन
25, 26, 28-       प्रबोधनकार ठाकरे सभागृह, अंबड पोलिस ठाण्यामागे, सिडको
27, 29, 31 –       राजे संभाजी स्टेडियम, सिडको
8, 9, 10, 11 –    सातपूर क्लब हाउस, सातपूर

Who is the ruling party of the Municipal Corporation? Decision on 122 seats today

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

19 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

19 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

20 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

20 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

20 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

20 hours ago