महाराष्ट्र

आऊटलेट कशाला हवा? भाग २

इनलेटलाच फिल्टर लावा – भाग २

 

डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732

 

 

 

आउटलेट कशाला हवा?

 

 

 

 

नितीन देसाई यांच्या आत्महत्येने एक विषय चर्चिला गेला, तो म्हणजे आपले दुःख, अडचणी, समस्या, चिंता, काळजी, मानसिक ताण तणाव व्यक्त करण्यासाठी एक “आउटलेट” असावे. सूचना काही वाईट नाही, हा उपाय असू शकतो, परंतु माझे म्हणणे असे की हा मानसिक ताण तणाव, दडपण, हतबलता, भीती, नैराश्य, क्रोध, वैफल्य निर्माणच होऊ देऊ नये.

 

 

 

 

 

सप्तशृंगी गडावरील मंदिरात आपत्ती व्यवस्थापन महिला कर्मचाऱ्यास बंदुकीने मारहाण

 

 

 

 

 

 

जर झालेच तर त्यातून कसे बाहेर पडावे, कसा विचार करावा, दृष्टिकोन कसा असावा, आणि मार्ग कसा निवडावा यावर भर द्यावा. या लेखाच्या पहिल्या भागास अनेकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता, वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या, सूचना केल्या तसेच काहींनी माझ्या मतावर आपले स्वतःचे मत मांडले.

 

 

 

 

अमित ठाकरे यांचा ताफा अडवल्याने टोल नाक्याची तोडफोड, समृद्धी महामार्गावरील प्रकार

 

 

 

 

 

त्यानुसार, मी आज त्यावर लिहीत आहे व माझ्या दृष्टीने काही महत्वाच्या गोष्टींवर आपले लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही माझ्या मताशी सहमत असलाच पाहिजे, असा माझा आग्रह नाही. परंतु, मी जे काही सांगणार आहे, दाखवणार आहे, ते तुम्ही तुमच्या जीवनाशी जुळवून (रिलेट करून) बघा, म्हणजे मी काय सांगतोय, हे तुमच्या लक्षात येईल, आणि नेहमीसाठी ते लक्षातही राहील. लेखातील मजकूराशी सहमत असल्यास, तो पुढे आपल्या स्वकीयांना पाठवा, ही नम्र विनंती.

 

 

 

 

 

 

ऑर्थोपेडिक सोयासायटीच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा डॉ. धुर्जड

 

 

 

 

 

 

सुरवातीला “आउटलेट” वर बोलतो. आपल्या मनातील गोष्टी बाहेर काढण्यासाठी एक जवळचा, विश्वासातला आपला हितचिंतक नेहमी जवळ असावा, ही बाब “आउटलेट” साठी अत्यंत गरजेचे आहे. मग अशी व्यक्ती बाहेर कुठेतरी जाऊन शोधण्यापेक्षा आपल्या घरातीलच असावी, असे मला एका वाचकाने सांगितले. ती व्यक्ती म्हणजे आपली “लाईफ पार्टनर”, अर्थात पती किव्हा पत्नी. अगदी खरे आहे, त्यांचे म्हणणे. जोडीदार जवळचा, विश्वासातला आणि आपला हितचिंतकही असतोच. दैनंदिन जीवनात रोजच्या रोज जर नवरा बायकोत चांगले संभाषण झाले तर दोघांनाही एक चांगला “आउटलेट” मिळेल. परंतु, त्यात एक बाब लक्षात ठेवावी, की सांगणाऱ्याला आपले मन मोकळे करू द्यावे, त्याच्या समस्येवर ऐकणाऱ्याने लगेचच उपाय, पर्याय, उपदेश, सल्ला, मार्गदर्शन करू नये. त्याने फक्त ऐकण्याची भूमिका बजवावी.

 

 

 

 

 

शहापूरजवळ क्रेन कोसळून १७ जणांचा मृत्यू तर ३ जखमी

 

 

 

 

 

 

त्याला कान द्यावा, धीर द्यावा, आधार द्यावा, आश्वासित करावे, एव्हढेच करावे. चूक तर अजिबातच दाखवून देऊ नये. असे केल्यास पुढच्या वेळी ती व्यक्ती काहीच सांगणार नाही, हे लक्षात असू द्या. लहान मुलांच्या बाबतीतही अशीच भूमिका ठेवावी. मुलांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या, त्यांचे मन समजून घ्यावे, त्यांच्या इच्छा अपेक्षा उद्देश आणि अडचणी लक्षात घ्याव्या. तुम्ही त्यांचे ऐकले, तरच ते तुमचे ऐकतील, हे विसरू नये. तुम्ही त्यांचे ऐकले तर त्यांचा तुमच्यावरील विश्वास, प्रेम आणि आदर वाढेल. मग तुम्ही जे सांगाल, ते पूर्णपणे ऐकतील.

 

 

 

 

 

 

लासलगाव येथे डिझेल चोरीचे प्रकार

 

 

 

 

 

 

 

“आउटलेट” साठी घराबाहेरील व्यक्ती निवडाल, तर त्यात एक जोखीम असू शकते. ती व्यक्ती तुमच्या खालावलेल्या आणि अडचणीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणार नाही, याची शाश्वती देता येत नाही. जर ती व्यक्ती तुमची सहानुभूती मिळवण्यासाठी तुमच्या दुःखात तुमच्यासोबत रडू लागली, तर समजून घ्या की त्यात काहीतरी गडबड आहे. तुमच्या मताशी खूपच जास्त सहमती दर्शवत असेल, तर त्याचा तुम्हाला फारसा उपयोग नाही, असे समजावे. कारण, खरा हितचिंतक/मार्गदर्शक कधीच तुम्हाला कमजोर करणार नाही, याउलट तो तुम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करेल, स्वतः जबाबदारी घेऊन तुम्हाला मदत करेल.

 

 

 

 

आऊटलेट कशाला हवा? भाग २

 

 

 

 

 

 

विधायक पर्याय सुचवेल व ते तुमच्याकडून करून घेईल. त्या व्यक्तीने काही विध्वंसक पर्याय सुचवले तर, तो तुमचा हितचिंतक नाही असे समजावे. काटा काढणे, समोरच्या व्यक्तीला त्रास देणे, त्याचे नुकसान करणे, त्याला अद्दल घडवणे, बदला घेणे, जीवाचे बरेवाईट करणे, लपून बसणे, पळून जाणे, बेकायदेशीर काम करणे, हे तुमच्या समस्येचे समाधान असू शकत नाही, त्यामुळे असे सल्ले देणाऱ्यापासून वेळीच सावध व्हावे. तुमचा “आउटलेट” चुकीच्या दिशेला चालला आहे, हे ओळखून घ्यावे.

 

 

 

 

जुगारी अड्डा – भाग ३

 

 

 

 

 

आता, नितीन देसाईंनी आत्महत्या का केली असावी? या प्रश्नाचे उत्तर शोधुया. आपल्याला त्यात सीबीआय किव्हा सीआयडी सारखा तपास करायचा नाही, तर नितीन देसाईंसारख्या व्यक्तीला आत्महत्या का करावी लागते, किव्हा त्यांच्यावर अशी वेळ का येते, हे जाणून घेणे आपल्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. तुम्ही म्हणाल की, त्यांना “आउटलेट” नव्हते. मी असे म्हणेन की त्यांच्याकडे इनलेटला लावण्यासाठी फिल्टर नव्हते. म्हणजे नेमकं काय? हे समजून घेऊया.

 

 

 

 

 

 

द्वारका चौकात भीषण अपघात; महिलेचा मृत्यू

 

 

 

 

 

आत्महत्या करणाऱ्यांपैकी अधिकांश पीडित हे पुरुष असतात. महिलाही आत्महत्या करतात, परंतु तुलनात्मक रित्या कमी. दोघांमध्ये आत्महत्या करण्याच्या कारणांमध्ये फरक आहे, कारण त्यांच्या मूळ स्वभावात, विचारसरणीत, आणि जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात फरक आहे. एखाद्या विशिष्ट प्रसंगाला सामोरे जाण्याच्या आणि त्यातून मार्ग काढण्याच्या पद्धतीतही फरक आहे. भारतात पुरुष प्रधान समाज व्यवस्था आहे. त्यामुळे पुरुषांमध्ये काही विशिष्ट गुण उपजत आलेले असतात.

 

 

 

 

 

 

नाशिकचे तहसीलदार 15 लाखांची लाच घेताना जाळ्यात

 

 

 

 

 

 

 

कुटुंब प्रमुख असल्यामुळे त्यांच्यासाठी कुटुंबाची जबाबदारी महत्वाची असते. काम करणे, पैसे कमवणे, कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे प्रमुख उद्देश. ते उद्देश साध्य करण्यासाठी उद्दीष्ठ (गोल, टार्गेट) ठरविणे, नोकरी, व्यवसाय, व्यापार, बँक बॅलन्स, लोन, हफ्ते, बचत, गुंतवणूक यासारखे अर्थ आणि वित्तीय व्यवस्थापन, नवीन प्लॅन्स आणि प्रोजेक्ट्स, मिळकत, प्रॉपर्टी, इस्टेट, मुलांचे शिक्षण, लग्न आणि नोकरी/व्यवसाय या गोष्टींना प्राधान्य देतात.

 

 

 

 

प्रा. हरी नरके यांचे निधन

 

 

 

 

 

 

पुरुषांना आयुष्यात हीच शिकवण दिली जाते, आणि म्हणून पुढे मोठे झाले की याभोवतीच त्यांचे जीवनचक्र फिरत असते. त्यामुळे त्यांना बाकीच्या गोष्टींमध्ये फारसा रस नसतो. केवळ काम, काम आणि काम करत असतात. त्यातून वेळ काढून इतर गोष्टींना वेळ देतात, अगदी स्वतःला सुद्धा. म्हणूनच त्यांच्यासाठी त्यांनी कमावलेला पैसा, बँक बॅलन्स, प्रॉपर्टी, इस्टेट, त्यांचे प्रोजेक्ट्स, प्लॅन्स, बँकेचे हफ्ते, ईएमआय, मुलांचे आणि भावी पिढीचे भवितव्य याच्याशी भावनिक नाळ जुळलेली असते.

 

 

 

 

अन्यायकारक भाडेवाढ रद्द करा , नागरिकांचे म्हाडाला निवेदन

 

 

 

 

यात कुठले विघ्न, अडचण, अडथळा, समस्या आल्यास किव्हा आर्थिक गणिते बिघडतात तेव्हा ते निराश होतात, खचून जातात. खूप भावुक होतात, सारासार व तर्काधारीत विचार करत नाही. बाहेर पडण्याचे मार्ग दिसत नाही. नितीन देसाईंचेही असेच झाले असावे. आपले आर्थिक चक्र विस्कटले आहे, वित्तीय गणिते सुटत नाही, किव्हा ते सोडवण्यासाठी मला माझी आयुष्यभराची मिळकत विकावी लागेल, किव्हा आता तिच्यावर जप्ती येणार. ही बाब त्यांना मान्य नसते. ५२ एकरावरील स्टुडिओचे मूल्य किमान ५०० कोटी असताना, अडीचशे कोटींच्या कर्जाला बळी पडलेले नितीनजी हे आपल्या स्टुडिओत भावनिक गुंतलेले होते. पंतप्रधानांसाठी लिहून ठेवलेल्या पत्रावरून ही बाब सिद्ध होते.

 

 

 

 

 

त्यांनी पंतप्रधानांना विनंती केली होती की माझा स्टीडिओ कुठल्याही बँकेच्या हवाली करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांवर मालिका बनविणाऱ्या नितीनजींनी महाराजांचा “जीव राखावा” हा मंत्र कसा विसरले. मराठा सरदारांचे “बचेंगे तो और भी लढेंगे” हे वाक्य का समजले नाही. “सिर सलामत तो पगडी पचास” हे तर आपल्याला शाळेतच शिकवलेले होते, नितीनजींना त्याचाही विसर कसा पडला?

याचेही एक कारण आहे. पुरुषांमध्ये दुसरा एक उपजत गुण असतो, हवं तर त्याला अवगुण म्हणा. पुरुष मंडळी आपल्या अडचणी, समस्या (प्रॉब्लेम्स) सहसा कुणाशी शेअर करत नाही. कुणाकडे लगेच मदतही मागत नाही. कुणासमोर समस्या मांडणे, कुणाकडे मदत मागणे हे त्यांच्यासाठी त्यांच्या पुरुषार्थावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यासारखे असते.

 

 

 

दुसरे कारण असे की मी अडचणीत आलो तर माझे आणि माझ्या कुटुंबियांचे काय होणार, माझी आयुष्यभराची कमाई जप्त होईल, माझे स्वप्न भंग होतील, आर्थिक अडचण आली तर मुलांचे आयुष्य उध्वस्त होईल या भीती आणि काळजीने ते कुणाकडे व्यक्त होत नाही. आपल्या अडचणी आपणच सोडवायला हव्या, अशा विचारात असतात. महिला मंडळी याला “मेल इगो” असेही म्हणतात. अशा काळात महिलांनी थोडे सबुरीने घ्यावे. त्यांना सल्ल्याची आणि उपदेशाचे गरज नसून, त्यांच्यावर विश्वास दर्शवून त्यांना धीर, आधार आणि साथ द्यावी, “फक्त लढ म्हणावं” इतकी माफक अपेक्षा असते. या काळात ते स्वतःतच गुंतलेले असतात, कमी बोलतात, चेहरा चिंताग्रस्त वाटतो, आजारही वाढू शकतात. जेव्हा ते आपल्या अडचणीतून बाहेर येतात, तेव्हा ते पुन्हा नॉर्मल होतात. तिसरा महत्वाचा गुण असा की, पुरुष मंडळी तर्कांवर आधारित विचार करतात. योग्य अयोग्य, चूक बरोबर, चांगले वाईट, हो नाही, करायचे किव्हा नाही करायचे या विचारांवर आधारित निर्णय घेतात.

 

 

निर्णयात भावना कमी आणि तर्क अधिक. नितीनजींचा जीवन संपविण्याचा निर्णय देखील तर्कांवर आधारित होता. पैसा, प्रॉपर्टी, मिळकत आणि माझ्या स्टुडिओवर बँकेची जप्ती येणार, माझा स्टुडिओ आता माझ्या हातून जाणार, माझी बदनामी होणार, माझे हसू होईल, सहकारी नावे ठेवतील, लोक काय म्हणतील, हे दुःख अधिक होते.

 

 

 

 

भावनिक विचार केला असता तर माझ्या मागे माझ्या पत्नीचे, मुलांचे काय होणार असा विचार केला असता, तर कदाचित त्यांनी आत्महत्येचा निर्णय बदलला असता. असो, जे घडले, ते घडून गेले आहे. परंतु, आपण त्यातून काही शिकलो नाही, तर अशा घटना घडतच राहणार, एके दिवशी आपल्याही बाबतीत घडू शकेल. पुढील भागात आपण यावर आणखी जास्त सखोल विचारविनिमय करणार आहोत. लेख आवडला तर पुढे पाठवा…!(क्रमशः)

*डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732

Devyani Sonar

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

2 days ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

2 days ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago